Festival Posters

Aadhaar Voter ID Link:आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2022 (15:10 IST)
How to Link Aadhaar Voter ID Card: भारत निवडणूक आयोग 1 ऑगस्ट 2022 पासून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू करणार आहे.महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये ही विशेष मोहीम सुरू आहे. मतदार ओळखपत्रात कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये आणि मतदार यादीतून चुकीचे नाव काढून टाकण्यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. यामुळे डुप्लिकेट वोटरकार्ड रोखण्यासाठी आयोगाला मदत होईल. 
 
NVSP वेबसाइटवर नोंदणी करा-
जर तुम्हाला मतदार नोंदणी पोर्टलद्वारे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करायचे असेल, तर तुम्हाला प्रथम NVSP पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी सर्वप्रथम वेबसाइटवर जाऊन New User या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुमचा कॅप्चा टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो टाका. हा OTP टाकल्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती टाका. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून तुमची सर्व माहिती नोंदणीकृत होईल.
 
अशा प्रकारे NVSP 1 सह मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करा, प्रक्रिया जाणून घेऊ या.
1 सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा पोर्टलच्या https://www.nvsp.in/ वेबसाइटवर क्लिक करा.
2 यानंतर सर्च इन इलेक्टोरल रोल पर्यायावर क्लिक करा.
3 यानंतर तुमचे सर्व वैयक्तिक तपशील जसे की EPIC क्रमांक आणि राज्य माहिती भरा.
4 त्यानंतर तुमच्या डाव्या बाजूला आधारचा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
5 यानंतर तुमचा आधार तपशील प्रविष्ट करा.
6 पुढे OTP पर्यायावर क्लिक करा.
7 तुम्ही OTP टाकताच तुमचा आधार क्रमांक पडताळला जाईल.
8 शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.
9 शेवटी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक संदेश येईल ज्यामध्ये आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी माहिती दिली जाईल.
10 तुमचा आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक होईल.  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ७ मे २०२६ रोजी सकाळी ६ तासांसाठी बंद राहणार

LIVE: मुंबईतील ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बची धमकी

बारामती विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला

ऑपरेशन सिंदुरच्या वर्षपुर्तीच्या आधी पंजाबमध्ये स्फोट

हा ममता दीदींचा पराभव नाही, हा लोकशाहीचा पराभव आहे, संजय राऊतांचे विरोधी पक्षांच्या एकतेवर मोठे भाष्य

पुढील लेख
Show comments