Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Aadhaar PVC Card साठी या प्रकारे करता येईल ऑनलाइन आवेदन

Aadhaar PVC Card साठी या प्रकारे करता येईल ऑनलाइन आवेदन
, बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (13:04 IST)
आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. भारतीयतेची ओळख प्रत्येक कामासाठी लागते. जर आपल्या आधार कार्डाचे काही नुकसान झाल्या वर किंवा गहाळ झाल्यावर आपल्याला बऱ्याच त्रासाला सामोरी जावं लागतं. 
 
UIDAI ने ट्विट करून सांगितले आहेत की आधार कार्ड आता PVC कार्डावर परत प्रिंट करता येणं शक्य आहे. हे कार्ड आपल्या ATM किंवा डेबिट कार्डा सारखेच सहजपणे आपल्याला वॉलेटमध्ये ठेवता येईल. UIDAI ने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे 'आता आपले आधार कार्ड सोयीस्कर आकारात असेल, जे आपण सहजपणे आपल्या पाकिटात ठेवू शकता. 
 
नवीन सुरक्षा वैशिष्ट्ये : तथापि हे कार्ड बनविण्यासाठी आपल्याला फक्त 50 रुपये खर्च करावे लागणार. आधाराचे हे नवे कार्ड दिसण्यात आकर्षक आणि टिकाऊ असणार. या सह PVC आधारकार्ड देखील नवीन सिक्योरिटी फीचर्सने सुसज्ज आहे. याला पूर्णपणे हंग्यामाची काळजी घेऊन बनवले गेले आहे. सिक्योरिटी फीचर्स मध्ये होलोग्राम, गिलोच पेटर्न, इक्रोटेक्स्ट समाविष्ट असणार. या प्रक्रिये मार्फत आपण ऑनलाईन आधार पीव्हीसी कार्ड मागवू शकता. 
 
* आधार कार्ड मागविण्यासाठी सर्वात आधी आपण UAIDI ची वेबसाईट उघडा.
 
*'My Aadhaar' विभागात जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर जाऊन क्लिक करा.
 
* आपले 12 अंकाचे आधार क्रमांक प्रविष्ट करा.
 
* सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा प्रविष्ट करा आणि ओटीपी साठी ​Send OTP वर क्लिक करा.
 
* रजिस्टर्ड केलेल्या किंवा नोंदणी केलेल्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीला सबमिट करा. 
 
* Aadhaar PVC Card चे एक प्रिव्हयु आपल्या समोर येणार.
 
* या नंतर खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शन वर क्लिक करा.
 
* आपण पेमेंट पेज वर याल इथे आपल्याला फक्त 50 रुपये फी जमा करायची आहे. 
 
* पेमेंट आपण कोणत्याही माध्यमाने करू शकता. या मध्ये क्रेडिट डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग सुविधा देखील आहे.
 
* पेमेंट केल्यावर आपल्या Aadhaar PVC Card ची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपा नेते गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांना धमकीचे फोन