Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अटल पेंशन योजना काय आहे, जाणून घ्या

अटल पेंशन योजना काय आहे, जाणून घ्या
, मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (11:45 IST)
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अटल पेंशन योजना एक अतिशय फायदेशीर सामाजिक सुरक्षा योजना आहे. ज्यामध्ये नियमितपणे गुंतवणूक केल्याने आपल्याला सेवानिवृत्तीनंतर खर्च करण्यासाठी नियमितपणे उत्पन्न मिळते. केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात ही योजना मे 2015 मध्ये सुरू केली. कारण या पूर्वी असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अशी कोणतीही योजना नव्हती, ज्याचे लाभार्थी आणि त्याच्यावर अवलंबित लोकांचे भविष्य काही प्रमाणात सुरक्षित राहील. म्हणून मोदी सरकाराने ही योजना सुरू केली आणि आपल्या दुसऱ्या कार्यकाळात देखील आवश्यक सुधारणा करून ते अधिक आकर्षक बनवले.
 
अटल पेंशन योजनेत गुंतवणूक करून कोणत्याही व्यक्तीला निवृत्तीनंतर दरमहा निश्चित पेंशन मिळवण्याचा हक्क असतो. या योजनेची सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे जर पेंशन मिळणारी व्यक्ती अकारण मरण पावते तर त्याच्यावर अवलंबित लोकांना याचा फायदा मिळण्याची तरतूद निश्चित केली आहे. या अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला आणि पत्नी देखील मरण पावल्यावर अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांना पेंशन देण्याची तरतूद आहे. अट अशी आहे की सेवानिवृत्ती झाल्यावर व्यक्तीला आजीवन पेंशन मिळण्यासाठी या योजनेत काही वर्षंच गुंतवणूक करावी लागेल. आपणास हे माहित असावे की आपल्या गुंतवणुकी बरोबरच अटल पेंशन योजनेत सरकार देखील आपल्या वतीने योगदान देते. ज्यामुळे ते आकर्षक बनून राहते. 
 
* ही योजना कोणासाठी बनविली आहे ?
सामान्यतः अटल पेंशन योजनेत कोणताही भारतीय आपली गुंतवणूक करू शकतो. आपल्याला या योजनेत भाग घेण्यासाठी केवळ बँकखाता असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेसाठी खाता खोलण्यासाठी हे आधारकार्डाशी लिंक असणे बंधनकारक आहे. अट अशी आहे की या योजनेचा लाभ त्यांनाच मिळू शकतो जे आयकर स्लॅब च्या बाहेर आहे. तसेच, ईपीएफ आणि ईपीएस योजनेचा लाभ पूर्वीपासून तर घेत नाहीत.
 
* वय मर्यादा किती आहे आणि किमान किती वर्षे गुंतवणूक करावयाची आहे ?
अटल पेंशन योजनेसाठी गुंतवणूक करू इच्छित असणाऱ्यांना सहा वर्गात विभागले आहेत, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपले वय वर्ष 18 ते 40 वर्षे  दरम्यान असणे आवश्यक आहे. या शिवाय, या योजनेत आपल्याला पेंशन मिळविण्यासाठी किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. जर या पूर्वी पतीची मृत्यू होते तर पत्नी किंवा मुलं एक रकमी किंवा अंशदान जमा करीत राहिले तर ते आयुष्यभर निवृत्ती वेतन घेण्यास पात्र ठरतील. पतीची मृत्यू झाल्यावर पत्नी आणि पत्नीच्या मृत्यू पश्चात नॉमिनी किंवा पात्र असलेली व्यक्ती एक रकमी दावा किंवा धनराशी किंवा आजीवन पेंशनचे अधिकारी असतील.
 
* अटल योजनेच्या अंतर्गत कोणत्याही गुंतवणूकदाऱ्याला किती पेंशन मिळेल स्लॅब जाणून घ्या -
या योजनेत पेंशनची ची रक्कम आपण केलेल्या गुंतवणुकीवर आणि आपल्या वयावर अवलंबवून असते. तथापि, या योजनेत कोणत्याही व्यक्तीला किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 5000 रुपये मासिक पेंशन मिळू शकते. पेंशन सुरू होण्याचे वय वर्ष 60 आहे. या वयापासून आपल्याला पेंशन मिळणे सुरू होईल. आपण शक्य तितक्या लवकर या योजनेत सामील व्हाल तितका जास्त फायदा आपल्याला मिळेल. उदाहरणासाठी जर एखादा व्यक्ती ज्याचे वय 18 आहे तो या योजनेशी जुडल्यावर त्याला दरमहा 210 रुपये गुंतवणूक करावी लागेल. मग सेवानिवृत्तीच्या नंतर म्हणजे वयाच्या 60 व्यावर्षी दरमहा 5000 रुपये मासिक पेंशन मिळेल. इथे सांगत आहोत की जे व्यक्ती आयकराच्या श्रेणीत येतात आणि सरकारी कर्मचारी आहेत किंवा पूर्वीपासूनच ईपीएफ, ईपीएस सारख्या योजनेचा फायदा घेत आहे, ते कोणत्याही किमतीवर अटल पेंशन योजनेचा भाग बनू शकत नाही.
 
* कमी गुंतवणुकीमध्ये सुरक्षित भविष्य -
खास गोष्ट म्हणजे की अटल पेंशन योजनेत आपण जेवढ्या लवकर सहभागी व्हाल, आपल्याला तितके कमी पैसे जमा करावे लागतील. जर आपल्याला वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5000 रुपये मिळवायचे असेल तर अटल पेंशन योजनेपेक्षा चांगला पर्याय मिळणार नाही. कारण जर आपण या योजनेत 18 व्या वर्षांपासून सामील झाला तर आपण दररोज 7 रुपये वाचवून दरमहा केवळ 210 रुपये जमा करता तर वयाच्या 60 व्या वर्षानंतर आपल्याला दरमहा 5000 रुपये मिळतील.

* किती मिळेल पेंशन आणि स्लॅब किती रुपये आहेत?
या योजनेंतर्गत पात्र व्यक्तीस 1000 ते 5000 रुपये पेंशन दरमहा मिळेल. आपण जेवढ्या कमी वयात या योजनेत गुंतवणूक करायला सुरू कराल, आपल्याला दरमहा तेवढेच कमी पैसे द्यावे लागतील.
 
उदाहरणार्थ - दरमहा 1000 रुपये पेंशन मिळविण्यासाठी गुंतवणूकदाराला त्याच्या वयानुसार 42 रुपया पासून ते 291 रुपये दरमहा जमा करावे लागू शकतात.पण हफ्ता भरणाऱ्या व्यक्तीची मृत्यू झाल्यास तर त्याच्या उमेदवारास एक रकमी 1,70,000 रुपये मिळतील. त्याच प्रमाणे जर आपण दरमहा 2000 रुपयाची पेंशन मिळविण्याचे इच्छुक असाल तर आपल्याला दरमहा 84 रुपया पासून ते 582 रुपयांचे हफ्ते भरावे लागतील. जे आपल्या वयावर अवलंबून आहे. जर या काळात व्यक्ती आणि त्याची पत्नी मरण पावली तर त्यांच्या नॉमिनी केलेल्या मुलास 3,40,000 रुपये एक रकमी मिळतील. त्याच प्रमाणे, आपल्याला 5000 रुपये पेंशन दरमहा ची मिळविण्यासाठी आपल्याला दर महिन्यात 210 रुपयांपासून 1,454 रुपये दरमहा जमा करावे लागतील. या दरम्यान व्यक्ती किंवा त्याच्या पत्नीची मृत्यू झाल्यास त्यांनी नॉमिनी केलेल्या मुलास 8,50,000 रुपयांची एक रकमी रक्कम मिळेल. 
 
* अटल पेंशन योजनेचा लाभ कोण -कोण घेऊ शकत ?
आम्ही सांगू इच्छितो की मोदी सरकारने सुरू केलेली अटल पेंशन योजना ही समाजातील दुर्बळ घटकांसाठी आहे जेणे करून त्यांना वयाच्या 60 व्या वर्षानंतर आर्थिक त्रास सहन करावा लागू नये. हेच कारण आहे की या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक जुळू शकतात, जे यासाठी वास्तविक पात्र आहेत. कारण या योजनेत मृत्युगत परिस्थितीला वगळता किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या अटल पेंशन योजनेत सामील होण्यासाठी कोणत्याही बँकेत आपले बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
 
अटल पेंशन योजनेविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी आपण दिलेल्या वेबसाईट लिंक वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता. 
https://npscra.nsdl.co.in/nsdl/scheme-details/APY_Scheme_Details.pdf

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवा