Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

UAN एक्टीव्हेट करण्याची सर्वात सोपी प्रक्रिया जाणून घ्या

UAN एक्टीव्हेट करण्याची सर्वात सोपी प्रक्रिया जाणून घ्या
, गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (10:19 IST)
युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) भविष्य निर्वाह निधीच्या ठेवी, पैसे काढण्यासाठी आणि इतर सुविधेसाठी वापरण्यात येतो. जर आपल्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कपत असल्यास आणि आपले पीएफचे शिल्लक पैसे तपासायचे असल्यास आपल्याला UAN नंबर सक्रिय करावे लागणार. 
आम्ही आपणास सांगत आहोत की युनिव्हर्सल अकाउंट नंबर कश्या प्रकारे सक्रिय किंवा एक्टीव्हेट करू शकतो. 
 
UAN नंबर सक्रिय झाल्यावर आपण आपल्या पीएफची शिल्लक रक्कम तपासू शकता. जर आपल्याला आपला UAN नाही माहीत तर आपण आपल्या पगाराच्या स्लिप वर तपासू शकता. जर आपल्याकडे स्लिप नाही तर आपण आपल्या ऑफिस किंवा कार्यालयाशी संपर्क करून आपला UAN नंबर जाणून घेऊ शकता.  
 
UAN नंबर सक्रिय करण्यासाठीचे काही महत्त्वाचे चरण -
1 सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेत स्थळावर जावे.
 
2  'Our Services' पर्याय निवडा आणि For Employees वर क्लिक करा.
 
3 'Member UAN '/Online Services' वर क्लिक करा.
 
4 'Activate Your UAN ' वर क्लिक करा (उजवीकडे 'Important Links ' च्या अंतर्गत उपलब्ध आहे)   
 
5 आपले तपशील जसे की युएएन, नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि कँपचा दाखल करा, आणि 'Get Authorization Pin ' वर क्लिक करा.
 आपल्या रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठविण्यात येईल. 
 
6 'I Agree' वर क्लिक करा आणि आलेला OTP नंबर घाला.
 
7 शेवटी, Validate OTP and Activate UAN वर क्लिक करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात पावसाच्या शक्यता, शेतकऱ्यानो काळजी घ्या