सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमाने सगळेजण एकमेकांपासून लांब असून देखील एकमेकांच्या जवळच आले आहे. आपण आपले विचार सोशल मीडियाच्या माध्यमाने मांडू शकतो किंवा दर्शवू शकतो. फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम असेच काही मंच आहे ज्याच्या माध्यमाने आपण आपले मत दर्शवू शकतो किंवा कोणाचे विचार आवडल्यास त्याला शेयर करू शकतो. आज आम्ही आपल्याला इंस्टाग्राम वर आपल्या स्टोरीला रिपोस्ट कशी करायची ते सांगत आहोत. त्यासाठी काही स्टेप्स आहे ते जाणून घेऊया-
इंस्टाग्राम वर एक स्टोरी रिपोस्ट केल्यानं आपण इतर लोकांच्या पोस्टला आपल्या पोस्टाच्या प्रमाणेच सामायिक करू शकता. आपण असे त्या फोटो किंवा व्हिडिओ साठी करू शकता ज्यामध्ये आपण उल्लेखित आहात किंवा नाही, किंवा आपली काहीही माहिती त्यात उपलब्ध असल्यास, आम्ही इथे आपल्याला हे करण्यासाठीचे काही सोपे मार्ग सांगत आहोत जे आपणास हे करू देतात.
इंस्टाग्रामवर स्टोरीला रिपोस्ट कशी करावी
पहिली पद्धत बद्दल आपण बोलत असलो तर आम्ही आपणास सांगू इच्छितो आहोत की ही पद्धत खूपच सोपी आहे. याचा अवलंब करून आपण सहजपणे स्टोरी रिपोस्ट करू शकता. जर आपण एखाद्याच्या फोटो किंवा व्हिडिओला आपल्या स्टोरी प्रमाणे पोस्ट करू इच्छित असल्यास आपल्याला खालील दिलेल्या काही चरणांचे अनुसरणं करावे लागणार.
* या साठी आपणास सर्वप्रथम आपल्या फोन मध्ये इंस्टाग्राम उघडावे लागणार
* या नंतर जे व्हिडिओ किंवा फोटो आपणांस रिपोस्ट करावयाचे हवे असल्यास त्यांची निवड करावी.
* या नंतर शेयर आयकॉन वर क्लिक करून एड पोस्ट टू स्टोरी करावं लागणार, नंतर योर स्टोरी वर क्लिक करावं.
* ज्या यूजर्सने त्यांचे फोटो आणि व्हिडियो सामायिक करण्याच्या पर्यायाला डिसेबल (अक्षम) केले असल्यास तरी ही आपण त्यांचा स्टोरी किंवा पोस्टाला सामायिक करू शकता, तथापि आम्ही आपल्याला असे करण्यापूर्वी त्या यूजर्स ची परवानगी घेण्यास सांगू. इथे काही चरण आहेत ज्याचा माध्यमाने आपण असे करू शकता.
* आपल्या फोन मध्ये इंस्टाग्राम उघडा.
* नंतर ते फोटो किंवा व्हिडिओ निवडा जे आपल्याला आपल्या स्टोरी प्रमाणे रिपोस्ट करावयाचे आहेत.
* या नंतर तीन डॉट्स ला क्लिक करा> इथे आपल्याला कॉपी लिंक निवडायचे आहे>नंतर या अॅप मिनिमाइज करावे लागणार.
* नंतर आपल्याला Ingramer.com या संकेतस्थळावर जावे लागणार.
* साईट लोड झाल्यावर आपणास हॅमबर्गर आयकॉन वर क्लिक करायचे आहे. हे आपल्याला टूल्स मध्ये मिळेल, या नंतर आपल्याला
Instagram Downloader
पर्यायाला निवडावे लागणार. आता इथे आपल्याला आपण जे फोटो किंवा व्हिडिओ कॉपी लिंक केले आहेत ते पोस्ट करावं लागणार.
* या नंतर आपल्याला सर्च बटण दाबून खाली स्क्रोल करून डाउनलोड पोस्ट पर्याय निवडायचे आहे. आता जेव्हा आपल्या फोनवर हे सर्व डाउनलोड होत, तेव्हा
आपल्याला पुन्हा इंस्टाग्राम वर जावे लागणार, नंतर आपण आपल्या कॅमेरा आयकॉन वर क्लिक करून आपल्या इच्छेनुसार फोटो किंवा व्हिडीओची निवड करू शकता.
* या नंतर आपण सेंड बटण वर क्लिक करून या स्टोरीला रिपोस्ट करू शकता.