Festival Posters

Digital Voter ID डाउनलोड करा, जाणून घ्या पद्धत

Webdunia
मंगळवार, 23 मार्च 2021 (16:00 IST)
कोणत्याही कामासाठी वोटर आयडी कार्डाची गरज पडते. मतदान ओळखपत्र एक आवश्यक डॉक्यूमेंट आहे. आता भारतीय निवडणूक आयोगाने डिजीटल वोटर आयडी ची सुविधा प्रदान केली आहे अशात आपण घरी बसल्या आपल्या आपल्या मोबाईल फोनवर हे डाउनलोड करु शकता.
 
या प्रकारे करा वोटर आयडी डाउनलोड-
 
e-EPIC अर्थात Elector’s Photo Identity Card एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट आहे. हे PDF मोबाईल किंवा कंम्यूटरवर सेल्फ-प्रिंटेबल रुपात डाउनलोड करता येतं. आपण वोटर डिजिटल कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करुन स्टोर करू शकतात किंवा याचे प्रिंट ही घेता येऊ शकतं. हे नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवरुन डाउनलोड केलं जाऊ शकतं.
 
डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी सोप्या स्टेप्स-
डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी http://voterportal.eci.gov.in/ या लिंकवर जा. 
येथे एक अकाउंट तयार करा. 
नंतर लॉग-इन करुन वेबसाईटवर दिसणाऱ्या e-EPIC या पर्यायावर क्लिक करा. 
नंतर e-EPIC नंबर किंवा रेफरेंस नंबर टाका. 
नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. 
OTP सबमिट केल्यानंतर e-EPIC डाउनलोड करुन डिजिटल कार्ड डाउनलोड करता येईल.
 
कार्डवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असल्यास हे डाउनलोड करण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. KYC द्वारे मोबाईल नंबर अपडेट करुन कार्ड डाउनलोड करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील दुकाने, हॉटेल्स आणि कार्यालयांवर मराठी फलक लावणे बंधनकारक; बीएमसीने एक महिन्याचा अल्टिमेटम दिला

मोठा निर्णय : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत ‘ऑप्टिंग आऊट’ हा पर्याय कायमचा रद्द केला

नीट पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असून अहिल्यानगर कनेक्शन आता अधिक गडद झाले; न्यायालयाने आरोपी धनंजय लोखंडेला दोन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला

रेल्वे मेगा ब्लॉक: गरीब रथसह अनेक गाड्या रद्द; अकोला रेल्वे प्रशासनाने १४ ते १८ मे दरम्यान विशेष मेगा वाहतूक ब्लॉक जाहीर केला

प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक तपशील उघड: रक्ताच्या गाठी आढळल्या, शरीरावर जखमांच्या खुणा

पुढील लेख
Show comments