Dharma Sangrah

LIC Policy : एकदा पैसा भरा आणि आविष्यभर दर महिन्याला 3000 रु मिळवा

Webdunia
बुधवार, 20 जानेवारी 2021 (11:52 IST)
एलआयसीकडे अश्या अनेक योजना आहेत, ज्यात एकदा पैसा भरावा लागतो आणि मग लगेच हजारो रुपये पेन्शन मिळू लागते. ही पेन्शन आपल्याला आविष्यभर मिळते. या स्कीममध्ये आपल्याला केवळ एकदा प्रिमियम द्याची आहे. ही प्रिमियम भरल्यावर आपल्याला लगेच 3000 रु मासिक पेन्शन मिळायला सुरुवात होईल. या पॉलिसीचं नावं आहे जीवन अक्षय पॉलिसी. या स्कीममध्ये आपण आपल्या गरजेप्रमाणे मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन मिळवू शकता.
 
या प्रकारे मिळेल पेन्शन
एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसी यात अनेक पर्याय असतात. परंतू आपल्याला प्रत्येक महिन्यात आणि लगेच पेन्शन सुरू करण्यासाठी 'ए' ऑप्शन (Annuity payable for life at a uniform rate) याची निवड करावी लागेल. पॉलिसी घेताना हा पर्याय निवडल्यास प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळू शकेल. केवळ भारतीय नागरिकांना या पॉलिसीत गुंतवणूक करता येईल. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे वयोगट मर्यादा 30 ते 85 वर्ष असे आहे.
 
लोनचा फायदा मिळेल
एलआयसीची जीवन अक्षय पॉलिसीवर आपल्याला लोन बे‍निफिट देखील मिळेल. आपल्याला या पेन्शन स्कीम अंतर्गत गरज पडल्यास लोन काढता येईल. आपल्याला किमान एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जेव्हाकि वार्षिक पेन्शन 12000 रु निश्चित आहे. आपण आपल्याला साथीदारासह ज्वाइंट एन्यूटी घेऊ शकता.
 
गुंतवणूक 
जर एखादा 40 वर्षीय गुंतवणूकदार 800000 रु चे सम एश्योर्ड निवडेल तर त्याला एकूण 8,14,400 रु ची सिंगल प्रिमियम भरावी लागेल. नंतर मासिक पेन्शन पर्याय निवडून प्रत्येक महिन्याला 3917 रुपयांची पेन्शन मिळणे सुरू होईल.
 
या प्रकारे देखील मिळू शकते पेन्शना
जसे सांगितले गेले आहे की आपल्याला तिमाही, सहामाही किंवा वार्षिक या आधारावर देखील पेन्शन मिळू शकते. तर वार्षिक आधारावर आपल्याला 48520 रु, सहामाही आधारावर 23860 रु आणि तिमाही आधारावर 11820 रुपयांची पेन्शन मिळेल.
 
केव्हा पर्यंत मिळेल पेन्शन
आपल्याला आविष्यभर 3000 रु ची मासिक पेन्शन मिळत राहील. गुंतवणूकदाराच्या मृत्यूवर पेन्शन थांबते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसने झीशान सिद्दिकी यांना उमेदवार म्हणून घोषित केले, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विधानसभेत दाखल

पुण्यात रासायनिक कंपनीत क्लोरीन वायू गळती, २४ जणांना श्वास घेण्यास त्रास, अनेक जण रुग्णालयात दाखल; तपास सुरू

सत्तासंघर्ष: सुनेत्रा पवार फडणवीसांच्या भेटीला; वर्षा बंगल्यावर तासभर चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बच्चू कडू शिवसैनिक होणार? एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची घोषणा केली; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली

LIVE: माजी मंत्री बच्चू कडू आता शिवसेनेचे धनुष्यबाण उचलणार?

पुढील लेख
Show comments