Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन योजना; अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

marriage
, मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:28 IST)
कोविड -19 साथरोग व लॉकडाउन कालावधीत  दिव्यांग व अव्यंग लाभार्थ्यांना विवाहास प्रोत्साहन देणाऱ्या आर्थिक सहाय्य योजनेसाठी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा विवाह  23 मार्च 2020 ते 30 डिसेंबर 2021 या कालावधीत झाला आहे अशा लाभार्थ्याना विवाह झाल्यानंतर 31 डिसेंबर 2021 पासून एक वर्षा करिता अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक योगेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 17 जून 2014 रोजीच्या शासन निर्णयाअन्वये दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत दिव्यांग व अव्यंग दांपत्यास विवाह केल्यास रूपये 50 हजार इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य केले जाते. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार या योजनेचा लाभ मिळणेकरिता विवाहानंतर एक वर्षाच्या आत संबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 80 व 82 अन्वये आयुक्त,दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना अर्ध न्यायिक अधिकार आहे. त्या अधिकारान्वये दिव्यांग दापंत्यांना अर्ज सादरीकरणाची मुदतवाढ करण्यात आली आहे. पात्र दिव्यांग दापंत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक योगेश पाटील यांनी केले  आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांचा ही मनसेला रामराम