Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (15:05 IST)
आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो. कोणत्याही योजना असो, बॅंकिंग, शैक्षणिक कामांमध्ये आवश्यक आहे. आधार कार्डात आपले नाव चुकले असेल पत्ता चुकला असेल तर काहीं न काही समस्या उदभवतात. जुन्या आधारकार्डात काही अपडेट करावे लागते. या साठी युडीआय म्हणजे युनिक आयडेंटिफेकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ऑनलाईन अपडेट सुविधा मोफत केली आहे. ही सुविधा काहीच काळासाठी आहे. 10 वर्ष जुने आधार कार्डाची माहिती अपडेट करण्यासाठी 14 मार्च पर्यंत अपडेट करूया शकता. यासाठी कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही मात्र ऑफलाईन उपडेट करण्यासाठी 50 रूपये शुल्क आकारावे लागणार. 
युडीआय ने पूर्वी आधारकार्ड नाव , पत्ता अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर मोफत आधार अपडेट करण्याची मुदत दिली होती. आता ती वाढवून 14 मार्च करण्यात अली आहे. ज्यांचे आधारकार्ड 10 वर्ष पूर्वी बनले आहे आणि ज्यांनी आधारकार्ड अपडेट केले नाही त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे.  यूआयडीएआयने myAadhaar पोर्टलवर कोणतंही शुल्क न भरता आधार अपडेट करण्यासाठी 14 मार्च 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे
आधार कार्ड घरी बसल्या कसे अपडेट कराल -
 
सर्वप्रथम https://myaadhar.uidai.gov.in या आधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. 
त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक आणि नोंदणीकृत क्रमांकावर आलेल्या ओटीपीच्या मदतीने लॉगिन करावं लागेल. 
लॉगिन केल्यावर Name/Gender/Date Of Birth & Address Update हा पर्याय निवडावा लागेल. 
त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या Update Aadhaar Online या पर्यायावर क्लिक करावं लागेल. 
डेमोग्राफिक पर्यायाच्या लिस्टमधील address हा पर्याय निवडून नंतर Proceed to Update Aadhaar वर क्लिक करावं लागणार. 
हे क्लिक केल्यावर आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करून नवीन रहिवासी पत्ता लिहावा लागेल. 
यासाठी विनाशुल्क तुमची रिक्वेस्ट सबमिट होईल.
 त्यानंतर तुम्हाला एक सर्व्हिस रिक्वेस्ट क्रमांक अर्थात एसआरएन मिळेल.
या क्रमांकाच्या मदतीनं तुम्ही तुमच्या रिक्वेस्टचं स्टेटस तपासू शकता.
तुम्ही घरबसल्या ऑनलाइन काही बदल करू शकता. परंतु, बायोमेट्रिक तपशील जसे की फोटो, बुबुळ आणि फिंगरप्रिंट आधार सेवा केंद्राला भेट देऊन अपडेट करावे लागतील.
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

डंपरची दुचाकी आणि पिकअपला धडक, ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी

मनू भाकरला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष तयार केला

LIVE: बुलढाण्याच्या पेनटाकळी येथील ग्रामस्थांचे उपोषण संपले

कॅनडामध्ये मोठा अपघात, लँडिंग करताना बर्फाळ जमिनीवर विमान उलटल्याने १९ प्रवासी जखमी

पुढील लेख
Show comments