rashifal-2026

सुकन्या समृद्धी योजना - नियम आणि फायदे

Webdunia
शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (11:46 IST)
सुकन्या समृद्धी योजनेचे शुभारंभ आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा हस्ते 22 जानेवारी 2015 रोजी मुलगी वाचवा मुलगी शिकवा या अंतर्गत केले गेले. या योजनेत मुलींसाठी बचत खाते उघडवून देण्यात येते. या योजनेस सुकन्या समृद्धी खाते असे देखील म्हटले जाते.  
 
वयोगट 10 वर्षाच्या कमी मुलींचे खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक, अन्य एजेन्सी मार्फत उघडले जाऊ शकतात. 
आपल्या देशामधील असा वर्ग जो आपल्या मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी पैसे साठवून काही करण्यास इच्छुक आहे ते टपाल खाता किंवा इतर एजेन्सी मार्फत कमीत कमी 250 रुपये जमा करून बचत खाते उघडू शकतात आणि जास्तच जास्त 1.5 हजार रुपये जमा करून आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित करू शकतात. 
 
या योजनेच्या सुरुवातीस 9.1 % अंतर वार्षिक दराने व्याज देण्यात आले होते नंतर आता मुलींसाठी बचत राशीवर 8.6 % व्याज दर मिळते. सुकन्या समृद्धी योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ज्यांचे उत्पन्न फार कमी आहे. 
 
सुकन्या समृद्धि योजना 2020 चे उद्दिष्ट्ये 
सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश्य मुलींना शैक्षणिक क्षेत्रात पुढे करून त्यांच्या लग्नात कुठलीच कमतरता येऊ न देणे आहे. या योजने मार्फत कमी उत्पन्नधारीच्या मुलीच्या शिक्षणास आणि लग्नासाठी लागणाऱ्या खर्चासाठी उपयोगी पडू शकते. ते आपल्या मुलीच्या नावाने खाता कमीत कमी 250 रुपयांनी बँकेत खाते उघडू शकतात. या योजनेमुळे मुलींना प्रोत्साहन मिळून त्या पुढे वाढतील. या योजनांचा मुख्य उद्देश मुलींच्या भ्रूण हत्येस रोखणे आहे.
 
नियम
या योजनेत मुलीच्या जन्मापासून ती दहा वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर हे खाते उघडता येते. 
मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर जमा राशी मधून 50 % रक्कम आणि मुलीचे वय 21 वर्षाचे झाल्यास तसेच मुलीचे लग्न झाल्यास पूर्ण जमा राशी काढता येऊ शकते. 
ह्यात जमा राशी आणि त्यावरील एजन्सीने जमा केलेली व्याज राशी अशे मिळेल. 
ह्याची एकच अट आहे की ही जमा राशी मुलीच्या 21 व्या वर्षी नंतरच मिळेल. 
 
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये धन राशी जमा करण्याची पद्धत 
या योजनेत नकदी धनराशी, डिमांड ड्राफ्टने जमा करता येते किंवा बँकेत कोर बँकिंग सिस्टमने पण हस्तांतरित (ट्रान्सफर) करता येते. नवे खाते उघडविण्यासाठी खातेधारकाचे नाव द्यावे लागणार. या मुळे कोणी ही आपल्या मुलीच्या खात्यात पैसे जमा करू शकेल. 
 
सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य घटक 
अधिनियम 1961 कलम यात धारा 80 ने आयकरवर सूट देते आणि उर्वरित राशी परिपक्वतेनंतर मिळेल. 
कमीत कमी 250 रुपये या राशीने खाते उघडू शकतो. 
ही केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेली सर्वात लहान बचत योजना आहे. 
लाभार्थी राष्ट्रीयकृत बैंक, पोस्ट ऑफिस, एसबीआय, आयसीआयसीआय, पीएनबी, एक्सिस बँक,एचडीएफसी, कुठल्याही बँकेत खाते उघडू शकतात.
 
सुकन्या समृद्धी योजनेस लागणारी कागद पत्रे
एकाच वेळी एकाधिक (जुळ्या किंवा तिळ्या) मुलींच्या जन्माच्या पुराव्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
आधार कार्ड
पाल्य आणि पालकाचे छाया चित्र
मुलीच्या जन्माचा दाखला
पॅन कार्ड (अर्जदाराचे)
राशन कार्ड (अर्जदाराचे)
रहिवासी प्रमाण पत्र (अर्जदाराचे)
 
आवेदन फार्म कुठे मिळेल
आपणास या योजनेचा फार्म लिंक वरून डाउनलोड करावा लागणार. फार्म भरून सर्व मुख्य कागदपत्रांना द्यावे लागणार आणि फार्म भरून कुठल्याही राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

प्रयागराजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान तलावात कोसळले

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत; राज ठाकरेंना काँग्रेससारखे धाडस दाखवण्यास सांगितले

मनोरुग्ण तरुणाच्या हल्ल्यात दोन वृद्धांचा मृत्यू, संतप्त जमावाने आरोपीला केली मारहाण; वर्धा मधील घटना

पालघर: साप तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक, वाहन आणि सरपटणारे प्राणी जप्त

पुढील लेख
Show comments