Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमाचा सिग्नल ओळखा!

संदीप पारोळेकर
' प्रेम' ही आपल्या मनातील अतिशय तरल भावना आहे. प्रेम एखादा कवी त्याच्या काव्यात व्यक्त करतो, लेखक कथेचे रूप देतो तर चित्रकार विविध रंगानी ते रेखाटत असतो. मात्र, आजचा आधुनिक प्रेमवीर स्वत:ला वाटेल तशा पध्दतीने ते व्यक्त करत असतो. प्रेमात दोघांकडून 'ग्रीन सिग्नल' असेल तरच ते फुलते. एकाच बाजूने सिग्नल म‍िळत असेल तर 'एक्सीडेन्ट हो गया, रब्बा रब्बा...' अशी म्हणायचीही वेळ येते. प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्याकडून मिळणारा सिग्नल हा 'ग्रीन' आहे किंवा 'रेड' आहे तो ओळखले पाहिजे.

आपण ज्या मुलीवर प्रेम करतो त‍िनेही आपल्यावर प्रेम करायला हवे, हा हट्ट धरणे योग्य नाही. कधी तरी ती आपल्या प्रेमाला समजून घेईल, सब्र का फल मिठा होता है, असे म्हणत आयुष्य घालविणारे 'देवदास'ही मोठ्या संख्येने आहेत. 'तो' किंवा 'ती' आपलं प्रेम समजून घेईपर्यंत किती जणांना आपण विनाकारण मनस्ताप देत असतो. असे विषय वास्तव जीवनात नाही तर एखाद्या कथेचे किंवा 'एक विवाह ऐसा भी', 'क्या यही प्यार है' या सारख्या चित्रपटांचे विषय होऊ शकतात. कारण कल्पनेच्या आधारे ते रंगविलेले असतात. 'जीवन' हे स्वप्नात जगता येत नाही, जीवन जगताना वास्तव परिस्थितीचे भान ठेऊन तिच्याशी सामना करावा लागत असतो. परंतु प्रेमाने पछाडलेल्या 'त्याला' व 'तिला' हे सांगेल कोण?

प्रेमात पडणारं वय हे आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचं वय असतं. हे वय आपलं आयुष्य घडवत असतं तसं उद्‍धवस्तही करत असतं.

प्रेम हे केवळ एकच बाजून फुलत नसून दोन्ही बाजूंनी फुलत असतं. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक संकेत मिळत नसेल तर त्याच्या विषयी प्रेम व्यक्त करून मनस्तापाशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही.

एकतर्फी प्रेमातून चांगलं घडण्याऐवजी वाईटच घडत असतं. प्रेमाच्या एका ऋतु मागून दुसरा ऋतू येत असतो. प‍िवळी झालेली पाने गळून पडतात तर त्या जागी हिरवी पालवी फुटते. प्रेम हे अचानक होत असतं, जबरदस्तीचा सौद्यात नेहमी घाटा सहन करावाच लागतो. आपला 'देवदास' होऊ नये म्हणून प्रेम व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीत आपल्याविषयी प्रेम आहे किंवा नाही हे ओळखणे आवश्यक आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

लघू कथा : लोभी कुत्र्याची गोष्ट

मशरूम दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या ट्रिक अवलंबावा

हिवाळ्यात बनवा पौष्टिक Egg Soup रेसिपी

साजूक तुपाचे त्वचेवर उपयोग करा, सुंदर त्वचा मिळवा

रेडियोलॉजिस्ट मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments