rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"चॉकलेट डे"म्हणून आठवण झाली

happy chocolate day
, बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (09:48 IST)
बालपणी पाहुणे यायचे घरी,
कोण आनन्द आमच्या चेहेऱ्यावरी,
कारण घरी गोड धोड होणार असायचं,
पाहुण्यां सोबत आमचं ही फाऊन जायचं,
जातांना पाहुणे, हातात काही पैसे द्यायचे,
हसत हसत "चॉकलेट"घेऊन घे म्हणायचे,
तोच दिवस असायचा आमचा चॉकलेट डे,
आम्हाला तेच तर खूपच आवडे,
चार भावंड घरी, खायला असायचो,
तेच चॉकलेट आम्ही सर्व वाटून खायचो,
चिमण्या दातांनी तुकडे व्हायचे त्याचे,
उष्ट बिष्ट काही नाही, मजेत सर्व खायचे,
शाळेत ही मैत्रिणी बरोबर खायचो वाटून,
"चॉकलेट डे"आपोआपच साजरा जायचा होऊन,
आज आहे "चॉकलेट डे"म्हणून आठवण झाली,
आमच्या पैकी सर्वांनीच ही श्रीमंती आहे ना अनुभवली!!
.....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'चॉकलेट डे' च्या शुभेच्छा Chocolate day Wishes in Marathi