Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Propose Day 2022:जोडीदाराला प्रपोज करायचे असेल तर हे उपाय अवलंबवा

Propose Day 2022:जोडीदाराला प्रपोज करायचे असेल तर हे उपाय अवलंबवा
, सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (20:39 IST)
प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास प्रसंगाची वाट पाहण्याची गरज नाही. आपण कधीही कुठेही प्रेम व्यक्त करू शकता पण रोजच्या व्यस्त जीवनात आपण आपले प्रेम व्यक्त करू शकत नाही. तर वर्षातील फरवरी महिन्याच्या आठवड्यात आपण आपल्या जोडीदाराला प्रपोज करू शकता. किंवा आपण आपल्या मनातील कोणाला सांगण्याचा विचार करत आहात तर या साठी व्हॅलेंटाईन वीक ही सर्वोत्तम संधी आहे. प्रपोज डे हा व्हॅलेंटाईन आठवड्याचा दुसरा दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगुल आपले प्रेम व्यक्त करतात. जर आपण पहिल्यांदा आपल्या मित्राला आपण  मनाची गोष्ट सांगणार असाल तर प्रपोज डे खास पद्धतीने साजरा करावा. म्हणजेच, समोरच्या व्यक्तीला अशा प्रकारे प्रपोज करा की तो आपले प्रेम नाकारू शकणार नाही. आपण अशा प्रकारे प्रपोझ करू शकता. 
 
योग्य जागा निवडणे- जर आपल्याला एखाद्याला प्रपोज करायचे असेल  तर लक्षात ठेवा की त्यांना कुठेही प्रपोज करू नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादी खास जागा निवडा. आपण त्यांना रोमँटिक ठिकाणी घेऊन जाऊ शकता किंवा सहलीला घेऊन जाऊ शकता. जर वातावरण चांगले असेल तर जोडीदार आपले  प्रेम आणि त्याच्या अभिव्यक्तीला सहज समजू शकतो.
 
सरप्राईझ द्या- या खास प्रसंगी आपण जोडीदाराचे मन लहान लहान सरप्राईझ देऊन आधीच जिंकू शकता.आपल्या प्रेमाला व्यक्त करण्यापूर्वी आपण त्यांना सुंदर फुले देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकता. चॉकलेट पण देता येईल. जर त्यांचा मूड चांगला असेल तर ते आपला  प्रस्ताव गांभीर्याने घेतील आणि आपले प्रेम नाकारू शकणार नाहीत.
 
डिनरला घेऊन जा- आपल्याला हवे असल्यास आपल्या पार्टनरला डिनरला घेऊन जाऊ शकता. जोडीदाराच्या आवडत्या डिशची ऑर्डर द्या. आपण त्यांची  आवडनिवड समजतात असे त्यांना वाटू द्या. छान डिनर आणि रोमँटिक वातावरण आपल्याला आपले  प्रेम व्यक्त करण्याची चांगली संधी देईल. ज्यामध्ये पार्टनर आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकतो.
 
भेटवस्तू द्या- फक्त प्रपोज करणं गरजेचं नाही, प्रेम व्यक्त केल्यानंतरचं तसे वागणंही महत्त्वाचं आहे. जर आपण आपल्या मनातले त्यांना सांगितले आणि त्यांनी आपले  प्रेम स्वीकारले तर आपण जोडीदाराला त्यांची आवडती वस्तू भेट देऊ शकता. भेटवस्तू प्रपोज करण्यापूर्वी आणि नंतरही दिली जाऊ शकते, हे महत्वाचे आहे की भेटवस्तू आपल्या  जोडीदाराच्या पसंतीची असावी. भेट अशी असावी की ती त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल. जर आपल्या  भावना आपल्या भेटवस्तूमध्ये प्रतिबिंबित होत असतील तर आपल्याला काही बोलण्याची गरजही भासणार नाही. आपण जोडीदाराला फोटो अल्बम किंवा हृदयस्पर्शी सुंदर व्हिडिओ देखील देऊ शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Home Remedies:गॅस आणि पोटफुगीच्या समस्येने हैराण आहात का? या घरगुती उपाय अवलंबवा