Marathi Biodata Maker

‘व्हॅलेंटाईन डे’ला असे दिसा आकर्षक

Webdunia
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (15:59 IST)
फेब्रुवारी महिना लागला की चाहुल लागते ती व्हॅलेंटाइन डेची. प्रत्येक तरुण तरुणी या प्री‌तीदिनाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. या दिवशी काय घालावे म्हणजे आपण आकर्षक दिसू याबद्दल बहुतांश मुली संभ्रमात असतात. या विशेष दिनी नेमके कोणते कपडे परिधान केल्यास तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल याबद्दल मार्गदर्शन करताहेत वुनिकच्या मुख्य स्टायलिस्ट भाव्या चावला.
 
१. जंपसूट्स आणि प्लेसुट्स : एकदम चीक आणि सोफिस्टिकेटेड लुक हवा असेल तर गडद लाल छटेचा जंपसूट निवडा. आणि लूक कंप्लिट करण्यासाठी एक स्लिक क्लच किंवा स्लिंग बॅग आणि हिल्स चा वापर करा. कॅज्युअल किंवा पबसाठीच्या लूकसाठी त्याचं शॉर्ट व्हर्जन वापरा. तुम्ही कुठे जाणार त्या ठिकाणावर आणि तुमच्या कम्फर्टनुसार हिल्स किंवा फ्लॅट्स घाला.
 
२. बटरफ्लाय स्लीव्ज असलेला कॅज्युअल ड्रेस : कॅज्युअल लंच किंवा दिवसातल्या आउटिंगसाठी सर्वोत्तम ड्रेस किंवा तुम्हाला अगदी भपकेबाज काही नको असेल तर हा पर्याय वापरून बघा. रफल्ड बटरफ्लाय स्लीव्जमुळे एक विशेष असा नाजूक लूक मिळतो आणि भडक लाल रंगामुळे तुम्ही गर्दीत हरवून जाणार नाही.
 
३. फॉर्मल मॅक्सि ड्रेस : जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या थीम पार्टीला जाणार असाल आणि तुम्हाला एकदम उठून दिसायचं असेल तर हा ड्रेस नक्की परिधान करा. ह्या ड्रेसमुळे तुमच्या शरीराचं सौंदर्य अधिक शोभून दिसेल आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावरून नजर हटवू शकणार नाही. साधे दागिने आणि हाय हिल्सचा वापरून हा लूक कंप्लिट करा.
 
४. पिंक लेस ड्रेस : आपल्याला माहित आहे की ब्लश टोन्स हा लेटेस्ट ट्रेंड आहे. ह्या पिंक ड्रेसची निवड हाय टी किंवा एलिगंट लंच डेटसाठी करा. व्हॅलेंटाईन डे साठी लेस ही आवश्यक गोष्ट असल्यामुळे चुकण्याचा प्रश्नच नाही जर तुम्ही नंतर पार्टीला जाणार असला तर सोनेरी किंवा चंदेरी रंगाचा बेल्ट आणि मॅचिंग पंप्स वापरायला हरकत नाही.
 
५. स्टेटमेंट टी'ज किंवा टॉप्स : जर रेड ड्रेस आणि पिंक स्कर्ट थिममध्ये तुम्हाला रस नसेल तर टॉपचा पर्याय आहेच. जर तुमच्या मनात एखादा क्युट लूक असेल तर हार्ट प्रिंट्स किंवा स्लोगन्स असलेला टी किंवा टॉप निवडा आणि जर आणखी सुंदर दिसायचं असेल तर एखाद्या रोमँटिक टॉपचा विचार करा. मात्र एखादं क्लासी फुटवेअर अजिबात विसरू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

'Bhanu Saptami' 2026 भानू सप्तमी विशेष सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सात्विक आणि गोड नैवेद्य पाककृती

नाश्त्यात या ३ गोष्टी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल आणि अशक्तपणा दूर होईल

बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य

पुढील लेख
Show comments