Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 15 March 2025
webdunia

आला बाबा हा "टेडी" हा नवीनप्रकार

आला बाबा हा
, गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (15:41 IST)
झोपलं होतं एक बाळ, कुशीत टेडी घेऊन,
निरागस कित्ती ते,  होतं त्यास घट्ट पकडून ,
आम्ही ही झोपायचो, आपली कापडी बाहुली घेऊन,
टेडी कुठं होता तेव्हा,बाहुली च न्यायची निभावून,
आई द्यायची ना चिंध्याची , आपल्या हाताने शिवलेली,
कधी लोकरीने,तर कधी मण्यांनी नटलेली,
लग्न वगैरे ही करायचो बरं आम्ही तिचे,
मैत्रिणी चा बाहुला असायचा, सोबत नखरे मैत्रीणी चे,
मग आला बाबा हा "टेडी" हा नवीनप्रकार ,
त्यांनी आमच्या बहुलीलाच केलं की हो हद्दपार,
जोतो तेच घेऊन देऊ लागला मुलांना,
जुन्या प्रकारास मग आता कुणी विचारे ना!
अशी झाली मग "टेडोबा"ची सर्वत्र ख्याती,
वाढू लागली हळूहळू त्याचीच महती!!
....अश्विनी थत्ते

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Promise Day प्रॉमिस डेच्या दिवशी पार्टनरला द्या ही खास वचने, नातं मजबूत होईल