Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'अमित शहांचा फोन उद्धव ठाकरेंना आलाच नाही'

Webdunia
सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (17:14 IST)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त खोटे असल्याचा खुलासा शिवसेनेने केला आहे. युती टिकविण्यासाठी अमित शहा यांनी उद्धव यांना फोन केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.

मात्र, प्रदेशअध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे शिवसेनेशी कोणतीही चर्चा होणार नाही, असा भाजपचा अंतिम निर्णय असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजप समोर 151-119-18चा प्रस्ताव पाठवला होता. भाजप स्विकारावा, यापेक्षा जास्त जागा देणे शक्य नाही. हा अंतिम प्रस्ताव असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते जास्त जागांसाठी ठाम राहिलेत. निवडणून न आलेल्या 19 जागांबाबत विचार करण्यात यावा, अशी चर्चा बैठकीत झाली. त्याबाबत शिवसेनेला पुन्हा आवाहन करण्याची मोर्चे बांधणी झाली. 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments