Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शहा मुंबईत येतील पण उद्धव ठाकरेंना भेटणार नाहीत

Webdunia
मंगळवार, 2 सप्टेंबर 2014 (15:20 IST)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना व अन्य घटक पक्षांमध्ये दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 4 सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महायुतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेली 25 वर्षांपासून भाजप- शिवसेनेने अनेक निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. मात्र यंदा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांआधी शिवसेना भाजपात मतभेदही निर्माण झाले आहेत. मात्र, वेळीच हे मतभेट मिटवले नाहीत तर दोन्ही पक्षांना निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं त्या जोरावर विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागांची मागणी भाजपचे नेते करत आहेत. जिथे संधी मिळेल तेथे सेनेला दाबण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होतोय. या पार्श्वभूमीवपर शिवसेनेनेही विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 288 मतदारसंघात लढण्याची तयारी ठेवलीय. शिवसेनेने राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची पाच सप्टेंबरला बैठक ठेवली आहे. 

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

Show comments