Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रवादीला 128 जागांचा प्रस्ताव, 14 मतदार संघांची नावे दिली

Webdunia
बुधवार, 24 सप्टेंबर 2014 (16:32 IST)
विधानसभा निवडणुकींची अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत तोडगा निघाला नाही. आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कॉंग्रेसने राष्ट्रवादीला 128 जागांचा प्रस्ताव दिला आहे. गत निवडणुकच्या फॉम्युल्यानुसार  तब्बल 14 जागा वाढवून दिल्या आहेत. 

2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीला 114 जागा दिल्या होत्या. आता त्यात 14 जागा अधिकच्या देऊ केल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसने 14 मतदारसंघाची नावे राष्ट्रवादीला कळवली आहेत. तरी देखील राष्ट्रवादीला हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता कमी आहे. यातील 12 जागा अपक्ष व राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार असल्यामुळे हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता तशी कमीच आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम व आघाडी तोडण्याचा अथवा करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

Show comments