Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विंदांची कविता

- अमोल कपोले

Webdunia
सोमवार, 15 मार्च 2010 (13:31 IST)
" मी"च्या वेलांटीचा
सुटो सुटो फास
जीव कासावीस
सत्यासाठ ी

असं सहज लिहून जाणार्या विंदांची कविता ही जुन्याच्या आवरणात नव्याची सुनीते गाणारी अशी आहे. एकाचवेळी संवेदनशीलता, भावनोत्कटपणा आणि वैचारिक अधिष्ठान अशा तीन डगरींचा समतोल तीत सांभाळला गेला आहे. त्यात साधी भासणारी शब्दकळा, पण वैश्विक आशय घेऊन येते, कारण विंदांच्या जीवनात मार्क्सवाद आणि मानवतेला महत्वाचं स्थान होतं. त्यामुळेच,

स्वातंत्र्याला झाला
स्वार्थाचा हा क्षय
नागड्यांना न्याय
मिळेचना.
मानवांचे सारे
माकडांच्या हाती
कुलुपेंच खाती
अन्नधान्य
असे परखड भाष्य त्यांच्या कवितेत आढळत े.

विज्ञानावर श्रद्धा दर्शवतानाच निष्क्रीय भक्तीवरच भाष्यही विंदांच्या कवितेत आढळतं. विंदांचे "आततायी अभंग" याबाबतीत खासच.
उदा.

करिता आदरें
सद्‌गुरुस्तवन
ज्यांनी सत्यज्ञान
वाढविले

धन्य पायथॅगोरस
धन्य तो न्यूटन
धन्य आइन्स्टीन
ब्रहृमवेत्ता

सद्‌गुरुंनी द्यावे
दासा एक ज्ञान
माझे दासपण
नष्ट होवो

आणि प्रयत्नवादाचा पुरस्कार करणार्या या ओळी -

सद्‌गुरुवाचोनी
सापडेल सोय
तेव्हा जन्म होय
धन्य धन्य

विंदांची कविता जीवनातील नावीन्याची ओढ व्यक्त करणारी आहेच,

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग

पण तिला आसक्तीचेही वावडे नाही,

शपथ तुला अंगाची
अंगांतिल संगाची
शपथ तुला रेतीची
भिजलेल्या
शपथ तुला मेंदीची
हिरमुसल्या
शपथ नजरबंदीची
त्या पहिल्या धुंदीची

शपथ तुला तहानेची
शपथ तुला तृप्तीची
शपथ तुला
शपथ तुला
शपथ तुला सरतीची,
भरतीची.

या ओळी पण विंदाच लिहून जातात. विंदांची शब्दकळा कधी अगदी अनपेक्षित प्रतिमा समोर आणते -

धुक्यात उठले करपट शत्रू
धुक्यांत मिटले करपट मित् र

किंवा

सूख करपले ओठांवरती
आणि दु:खही, फक्त थुकीला
वास राहिला झालेल्याचा
फक्त्त स्मृतीची उरली लीला

किंवा

ओठांच्या काठांवर आहे
कुबड काढूनी बसला कोणी
दुडदुडणारे शब्द छबुकडे
लांब लांब नाकाने अडवित.

विंदांची "तालचित्रे" ही सुद्घा अनुभवण्याचीच गोष्ट आहे.

झपताल पहा -

ओचे बांधून पहांट उठते... तेव्हापासून झपझपा वावरत असतेस.
कुरकुरणाऱ्या पाळण्यांमधून दोन डोळे उमलू लागतात
आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठींतून तुझ्या स्तनांवर
बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने
म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. आणि नंतर
उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो
म्हणून तो तुला हवा असतो! मधून मधून तुझ्या पायांमध्ये
माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात, त्यांची मान
चिमटीत धरुन तू त्यांना बाजुला करतेस. तरीपण
चिऊ काऊच्या घासांमधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तुंमध्‍ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात..स्वागतासाठी "सुहासिनी"असतेस,
वाढतांना "यक्षिणी"असतेस, भरवतांना "पक्षिणी" असतेस,
साठवतांना "संहिता" असतेस, भविष्‍याकरता "स्वप्नसती" असतेस.
.... संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

विंदांची बालगीते आणि ललितनिबंध हे तर त्या त्या साहित्यप्रकारातले मैलाचे दगडच आहेत.
ग्लोबलायझेशनचं नावही कुणी ऐकलं नसेल, अशा काळातच विंदांच्या दृष्ट्या प्रतिभेने आपल्या
कवितेतून ग्लोबलायझेशनचे मांडलेले चित्र पहा -

मिसिसिपीमध्ये
मिसळू दे गंगा
ऱ्हाईनमध्ये नंगा
करो स्नान

सिंधूसाठी झुरो
ऍ़मेझॉन थोर
कांगो बंडखोर
टेम्ससाठी

नाईलच्या काठी
रॉकी करो संध्या
संस्कृती अन वंध्या
नष्ट होवो

... रक्तारक्तातील
कोसळोत भिंती
मानवाचे अंती
एक गोत्र

अशा या विंदांच्या विश्वव्यापी प्रतिभेला लाख लाख सलाम!

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

Show comments