Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावकरांना ध्यास सिंधूचा

Webdunia
सन 1952 मध्ये सावरकरांनी अभिनव भारत या आपल्या क्रांतिकारक संस्थेचा सांगता समारंभ केला. या समारंभाच्यावेळी त्यांची भाषणे समग्र सावरकर वाङ्‍मय खण्ड 8 आणि क्रांतिघोष या पुस्तकात छापलेली आहेत. या भाषणात त्यांनी देश स्वतंत्र कसा झाला, देशाने पुढे कसे वागावे हे सांगितले आहे. तसेच याच भाषणात त्यांनी म्हटले आहे की आज तीन चतुर्थाश भारत स्वतंत्र झाला असला तरी जिच्यामुळे आम्हाला हिंदू हे नाव प्राप्त झाले ती आम्हाला पूज्य असलेली सिंधूनदी अजून स्वतंत्र झालेली नाही याचे दु:ख आम्हाला आहे. हे दु:ख दूर करण्यासाठी, हा अपमान भरून काढण्यासाठी हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उठेल आणि हे सिंधु तुला तो मुक्त करील!!

पुढे सन 1953 मध्ये त्यांनी अभिनव भारत स्मारक ‍मंदिर बांधून सशस्त्र क्रांतीकारकांचे स्मारक केले. 1955 मध्ये रत्नागिरी येथे जाऊन तेथील कार्याचा रौप्य महोत्सव साजरा केला. 1957 मध्ये त्यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानात 1857 ची शताब्दी साजरी करून देशाला सांगितले की तुम्ही केवळ बुद्धाची उपासना करती न बसता युद्धसज्ज व्हा. 1958 मध्ये अनेक ठिकाणी सावरकरांचा 75 वा जन्मदिन साजरा करण्यात आला 1960 मध्ये ते 50 वर्षाची शिक्षा भोगून अंदमानातून सुटले असते. ते वर्षही त्यांनी पाहिले म्हणून अनेकांनी त्यांना 'मृत्यूंजय' मानून मृत्यूंजय सावरकर म्हणून त्यांचा सन्मान केला. या काळात सावरकरांनी आपला 2000 वर्षाचा इतिहास सांगणारा 'सहा सोनेरी पाने' हा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. तो प्रत्येकाने वाचावा. सन 1962 मध्ये चीनने पंचशील कराराचा भंग करून भारतावर आक्रमण केल्यावर सार्‍या देशातील सुबुद्ध लोकांना युद्धसज्ज होण्याचा सावरकरांचा उपदेश पटू लागला. देश शस्त्रसज्ज होऊ लागला. त्यामुळे 1965 आणि 1971 च्या पाकिस्तानी आक्रमकांना हिंदुस्थान तोंड देऊ शकला.

आर्त्मापण
पण आपल्या नेत्यांनी हानी भरपाई न घेता जिंकलेलाप्रदेश सोडला हे सावरकरांना रुचले नाही. त्यावेळी ते 82 वर्षाचे होते. काही लोक म्हणतात की दोन जन्मठेपी भोगलेले सावरकर केवळ 82 वर्षाचे नसून 160 वर्षाचे आहेत! चार वेळा मृत्युला तोंड देऊन ते जिवंत राहिले आहेत. पण स्वत: सावरकरांना थकत चाललेले शरीर घेऊन कसेतरी जगणे पसंत नव्हते.

त्यांनी ठरविले की शंकराचार्य, चैतन्य महाप्रभू, ज्ञानेश्वर, तुकाराम या महान तत्त्वज्ञानी महापुरुषांप्रमाणे आपणही आत्मार्पेण करायचे! त्याप्रमाणे 22 दिवस उपोषण करून क्षीण झालेले शरीर येथे सोडून ते फाल्गुन शुद्ध षष्ठी कलिसंवत 5068 दि. 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी स्वर्गी गेले. तेथून ते सांगत आहेत, हिंदू तरुणांनो! स्वाभिमान ठेवा, सैनिक व्हा, विज्ञाननिष्ठेने राहा, हा हिंदुस्थान अखंड करून या जगात ऐक मोठे राष्ट्र म्हणून सन्मानाने जगा.

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments