Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्भय म्हणजे ‘जिला भय नाही अशी’

श्रीमती भानुमती नरसिंहन

आर्ट ऑफ लिविंग
WD
निर्भय म्हणजे ‘जिला भय नाही अशी’. स्त्रिया खरोखरच भीती न बाळगता समाजात जागू शकतील यासाठी आपण काय करू शकतो ? निर्भायाचे जीवदान वाया गेले नाही. सामाजात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी काही तरी मार्ग शोधून काढण्याबद्दल तिने समाजात इतकी सजगता आणि जागृती निर्माण केली. मुलींच्या अशा कितीतरी कुणाला न कळलेल्या गोष्टींचे तिने प्रतिनिधित्व केले.

ही काही केवळ आत्ता घडत असलेली घडत नाहिये. द्रौपदी आणि सीता यांच्यासारख्या काही सामर्थ्यवान स्त्रियांनाही किती घृणास्पद आणि अपमानास्पद प्रसंगांना तोंड द्यावे लागले. जिथे हक्क डावलले जातात असे कोणत्याही प्रकारचे अन्याय म्हणजे मूल्यांची पायमल्लीच आहे. याचा मुळापासूनच विचार व्हायला हवा. आणि लोकांना नैतिकतेचे शिक्षण देण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे मानवी मूल्ये. आजकाल शाळेतही मूल्य शिक्षण हा विषय बाजूलाच पडलेला असतो.
आपल्या प्राचीन ग्रंथांमधून, राग, लोभ, मद, मोह मत्सर आणि वासना षड् रिपू सांगीतालेआहेत. यापैकी कोणत्याही एकामुळे आपली अधोगती होऊ शकते. त्यांच्या प्रभावामुळे एकमेकाची काळजी घेणे, एकमेकात वाटून घेणे य गोष्टी हरवून जातात. त्यामुळे अशा घटना घडतात.

या दुर्घटना कशा टाळायच्या ? अध्यात्मामुळे हे शक्य होते.त्यामुळे स्वत:बद्दलच्या जाणीवेची आणि जीवनाकडे बघण्याची कक्षा रुंदावते. आपले मनोबल, मन:शांती आणि दृष्टीकोनाची स्पष्टता वाढते.

शंका आणि असुरक्षिततेची भावना या केवळ ऊर्जा कमी असल्याची लक्षणे आहेत.अशा घटना बघितल्यानंतरही काही न करता गप्प राहणे हे देखील ऊर्जा कमी असल्याचे लक्षण आहे. अशावेळी आपण पटकन काही निर्णय घेऊ शकत नाही की काही करू शकत नाही. फक्त गोष्टी पुढे ढकलणे आणि पश्चाताप करणे इतकेच घडते. जेव्हा समाजात कमी उर्जेचा दिसून येतो तेव्हा योग आणि ध्यान यासारख्या साध्या सोप्या गोष्टींनी सत्व ( शुद्धता, मनाची शांती, सकारात्मकता) वाढते. आणि साहजिकच गुन्हे कमी होतात.

आपल्या शरीरात सात चक्र म्हणजेच उर्जेची स्थाने आहेत. या स्थानांमधील उर्जेच्या प्रवाहामुळे वेगवेगळ्या सकारात्मक, नकारात्मक भावना निर्माण होतात. जेव्हा ही ऊर्जा ऊर्ध्वगामी असते तेव्हा सकारात्मक गुण दिसून येतात. जेव्हा ही ऊर्जा अधोगामी असते तेव्हा मोह,वासना आणि मत्सर यासारख्या नाकारातमक भावना दिसून येतात. त्यामुळेच ऊर्जा वाढती ठेवणे महत्वाचे असते. असे करण्याने कमी उर्जेचे परिवर्तन सृजनशिलतेत होऊ शकते.

समाजात कला आणि संस्कृतीचे जतन केल्याने हे होऊ शकते आणि त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. त्यामुळेच पूर्वीच्या काळी मुलांना कोणती ना कोणती कला, संगीत किंवा नृत्य हे शिकवले जायचे. सण साजरे करण्यानेही उर्जेचा स्तर वर राहण्यास आणि सामाजात आपलेपणा टिकून रहाण्यास मदत होते.

या पुरातन ज्ञानाकडे पुन्हा एकदा बघण्याची आणि आपल्या समाजाला पुनरुज्जीवीत करण्याची वेळ आली आहे. पुरुष आणि महिला दोघांनीही काही जबाबदारी घेण्याची गरज आहे. आई, बहिण, मैत्रीण किंवा पत्नी या सर्व भूमिकांमध्ये मूल्ये जपली जात आहेत याकडे स्त्रियांनी लक्ष दिले पाहिजे. स्त्रियांना योग्य वेळी योग्य असे मूल्याधारित शिक्षण मिळायला हवे. नकारात्मक भावनांना आणि तणावांना कसे हाताळायचे हे त्यांना शिकवायला हवे. जेव्हा घरातील स्त्री तणावाखाली असते तेव्हा आई तणावाखाली असते. मग त्याचा परिणाम सगळ्या घरावर आणि मुलांवर दिसून येतो. पुरुषांचेही असेच आहे. हीच योग्य वेळ आहे. आपण मानवी मूल्ये जोपासून आणि आपल्या मुलांमध्ये अगदी खालपासून ते सामाजातील वरच्या स्तरापर्यंत सकारात्मक गुण जोपासून आपल्या उर्जेचा स्तर आणि समाजातील सत्व वाढवायला हवे. असे करू नका असे नुसते म्हणण्याच्या ऐवजी त्यांना काही योग्य मार्ग सुचवायला हवा.

आपण भूतकाळ तर्बदालू शकत नाही [पण आपण त्यापासून धडा शिकायला हवा आणि काही वर्तमानात काही सकारात्मक पावले उचलायला हवी आणि अशी अघोरी कृत्ये रोख्लीपाहीजेत. आध्यात्मिकता हेच यावरचे उत्तर आहे. योग आणि ध्यान ह्या आता चैनीच्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. तर त्या आता शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा पाया बनल्या आहेत. आपल्या मुली खरोखरच जर आपल्याला मुक्त आणि आनंदी राहायला हव्या असतील तर याची आता समाजाला गरज आहे.
लेखिका International Women’s Conference च्या अध्यक्षा, ध्यान शिक्षिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधीक्षक आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments