Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कामसुत्र आणि योगासन

Webdunia
NDND
योगशास्त्रात आसने आहेत, त्याचप्रमाणे कामसुत्रातही संभोगाची काही आसने आहेत. परंतु, संभोगाची आसने व योगासने यांचा थेट काही संबंध नसला तरी योगासनाच्या अभ्यासावरच संभोगाची आसने आधारीत आहेत.

योगासने-
योगासनाचे पाच प्रकारात विभाजन करण्यात आले आहे.

(1) पहिल्या प्रकारातील योगासनाची नावे पशु-पक्ष्याच्या उठण्या-बसण्यावरून व चालण्या-फिरण्यावर आधारीत आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या नावावरून त्यांची नावे पडली आहेत. आहे. उदा. वृश्चिक, भुंग, मयूर, शलभ, मत्स्य, सिंह, बक, कुक्कुट, मकर, हंस, काक आदी.
(2) दुसर्‍या प्रकारातील योगासनाची नावे विशेष वस्तुच्या गुणधर्मावर आधारीत आहे. - नागर (हल), धनुष, चक्र, वज्र, शिला, नाव (नौका) आदी.
(3) तिसर्‍या प्रकारातील योगासनाची नावे वनस्पती व वृक्षांवर आधारीत आहे. - वृक्षासन, पद्मासन, लतासन, ताडासन आदी.
(4) चौथ्या प्रकारातील योगासनाची नावे शरीराच्या विशेष अवयवाच्या नावावर आधारीत आहे. उदा. शीर्षासन, एकपादग्रीवासन, हस्तपादासन, सर्वांगासन आदी.
(5). पाचव्या प्रकारात योगासनाची नावे योगीपुरूष, ऋषी यांच्या नावावर आधारीत आहे. जसे की, महावीरासन, ध्रुवासन, मत्स्येंद्रासन, अर्धमत्स्येंद्रासन आदी.

योगासनाप्रमाणे संभोगाचीही आसने आहेत. आचार्य बाभ्रव्य यांनी संभोगाची एकूण सात आसने सांगितली आहेत. ती पुढील प्रमाणे...
1. उत्फुल्लक, 2.विजृम्भितक, 3. इंद्राणिक, 4. संपुटक, 5. पीडीतक, 6. वेष्टीतक, 7. बाडवक

खाली काही आसने आहेत, जी संभोगासाठी उपयुक्त आहेत.
NDND

आचार्य सुवर्णनाभ यांनी दहा योगासने सांग‍ितली आहेत.
1. भुग्नक, 2.जृम्भितक, 3.उत्पी‍डीतक, 4.अर्धपीडीतक, 5.वेणुदारितक, 6.शूलाचितक, 7.कार्कटक, 8.पीडीतक, 9.पद्मासन, 10. परावृत्तक.

आचार्य वात्स्यायन यांनी सांगितलेली आसने पुढील प्रमाणे-
विचित्र योगासने -: 1. स्थिररत, 2.अवलम्बितक, 3.धेनुक, 4.संघाटक, 5.गोयूथिक, 6.शूलाचितक, 7.जृम्भितक, 8.वेष्टितक.

इतर आसने-: 1. उत्फुल्लक, 2.विजृम्भितक, 3.इंद्राणिक, 4. संपुटक, 5. पीड़ितक, 6.बाड़वक 7. भुग्नक 8.उत्पी‍ड़ितक, 9. अर्धपीड़ितक, 10. वेणुदारितक, 11. कार्कटक 12. परावृत्तक आसन 13. द्वितल व 14. व्यायत, असे एकूण 22 आसन आहेत.

योगासन व संभोगासन हे एकाच प्रकारचे आसन असल्याचा समाजात गैरसमज झाला आहे. दोघामधील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. संभोगासन योग्य पध्दतीने व त्याला पारंपारिक स्वरूप येण्यासाठी योगासनाचा आधार घेतला जातो.

NDND
संभोगासन करण्यापूर्वी 'अंग संचालन' अर्थात सूक्ष्म व्यायाम केला पाहिजे.

(1) पद्‍मासन :
पद्‍मासन केल्याने स्नायू, पोट, मूत्राशय व गुडघे यांच्यात ताण निर्माण होऊन ते तंदुरस्त होतात. त्यामुळे शरीरात एक विशिष्ट प्रकारची उत्तेजना संचारते. उत्तेजनामुळे आपल्या क्षमतेत वाढ होते.

(2) भुजंगासन :
भुजंगासन केल्याने आपली छाती रूंद व बळकट होत असते. पाठ व मणक्याचे आजार दूर करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. तसेच स्वप्नदोषही दुर होतात. हे आसन नियमित केल्याने वीर्य दौर्बल्य संपुष्टात येते.

(3) सर्वांगासन :
सर्वांगासन केल्याने खांदे व मान यांच्यात तंदरूस्ती येते. नपुंसकता, नैराश्य, तसेच गुप्त आजार दूर होत असतात.

(4) हलासन :
शाररीक ऊर्जा वाढविण्यासाठी हलासन केले जात असते. पुरुष व महिलाची यौन ग्रंथींना मजबूत करून अधिक सक्रिय करण्‍यासाठी हलासन अत्यंत महत्त्वाचे आसन आहे.

(5) धनुरासन :
कामेच्छा जागृत करण्यासाठी व प्रणय क्रियेत सहाय्यक असणारे हे आसन आहे. तसेच पुरुषाचे वीर्य अधिक घट्ट होते तर पुरूषाचे लिंग व स्त्रीची योनी तंदुरूस्त बनत असते.

(6) पश्चिमोत्तनासन :
सेक्स तसेच प्रणयक्रीडेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पश्चिमोत्तनासन केले जाते. स्वप्नदोष, नपुंसकता तसेच महिलाच्या मासिक धर्माशी संबंधीत दोष दूर होत असतात.

(7) भद्रासन :
भद्रासन नियमित केल्याने रति सुखातील एकाग्रतेत वृध्दी होत असते. हे आसन पुरुष व स्त्रिया स्नायु तंत्र व रक्तवहन तंत्रात तंदरूस्ती निर्माण करत असते.
NDND

(8) मुद्रासन :
मुद्रासन केल्याने तणाव कमी होतो. महिलाच्या मासिक धर्माशी संबंधीत सर्व प्रकारचे विकार दूर होतात. तसेच रक्तस्राव थांबण्यासाठी रामबाण उपाय आहे.

(9) मयुरासन :
मयुरासन केल्याने पुरुषाच्या वीर्य व शुक्राणुमध्ये वृध्दी होते. महिलाच्या मासिक धर्म संबंधित विकार दूर होतात. एक महिना मयुरासन नियमित केल्याने पुरूषामधील क्षमता वाढते.

(10) कटी चक्रासन :
कटी चक्रासन केल्याने कंबर, पोट, पाठ, मनके, गुडघे व जांग यांचे विकार दूर होतात. तसेच ‍स्त्रियांच्या शरीरावरील चरबी नाहीशी होऊन शरीर सुडौल बनत असते. मानसिक तसेच शारीरिक थकवाही नाहीसा होत असतो.

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

ऐक्नेसाठी लाल कोरफड वापरा, स्किन उजळेल

थंडीत रात्री मोजे घालून झोपत असाल तर जाणून घ्या हे सत्य

जर तुम्ही तुटलेले नाते सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर या सोप्या टिप्स फॉलो करा

पाल पळवण्यासाठी फक्त एक घरगुती उपाय

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या