Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीम आणि योगात फरक काय?

Webdunia
WD
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार करा.

तुम्हाला एखाद्या शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, कुस्तीत जायचे असेल, हिरो बनायचे असेल किंवा वजन उचलायचे असेल
तर जीम किंवा आखाड्यात जाणे योग्य आहे. पण हे सर्व करायचे नसेल तर मग थोडा विचार करणे जरूरी आहे. जीममद्ये अंगमेहनतीची कसरत करून घेतली जाते. या उलट घरगुती योग प्रकारत संपूर्ण अंगाला व्यायाम दिला जातो. पण उगाचच 'घामकाढू' मेहनत होत नाही. जीमच्या कसरतीनंतर तुम्हाला थकवा जाणवतो पण योगासन केल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटते.

वयाचा फरक : लहानपणी शरीर फारच लवचिक असतं. वय वाढत त्याचबरोबर थोडेसेही अपघात झाले तर हाड तुटू लागते. लहान मुलगा छोट्या मोठ्या जागेवरून पडतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी असते पण तरूण व्यक्ती पडतो तेव्हा त्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. जीममध्ये हाडे व स्नायु दणकट होतात. पण जीम सोडली तर हे कमावलेले शरीर सुटते. टणक झालेली हाडे आणि स्नायू म्हातारपणाकडे लवकर घेऊन जातात.

जीमचे शरीर : जीम जाण्यामुळे शरीर मजबूत व दणकट होते. त्या शरीराला अतिरिक्त जेवणाची गरज पडते. पण जीम सोडल्यानंतर शरीर एकदम ढिले पडू लागते म्हणून जीमची कसरत सुरू ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा हात-पायाचे दुखणे सुरू होते. वय वाढल्या बरोबरच सांध्यांची दुखणी डोके वर काढतात. स्नायू दुखू लागतात.

ND
योगाचे शरीर : योग केल्याने शरीर लवचिक आणि मऊ होते. शरीराला अतिरिक्त भोजनाची गरज भासत नाही. योग केल्याने रोगप्रतिरोधक क्षमतेत वाढ होते. जास्त काळ योग केल्यानंतर शरीरात कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाही.

जीमला जावे असे वाटत असेल तर जरूर जा! पण शरीराला थकवण्यासाठी नको!
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे म्हणजे काय? का साजरा करतात जाणून घ्या

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

Show comments