Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनुरासनाने चरबी कमी करा!

वेबदुनिया
WD
WD
या आसनामध्ये शरीर पूर्णपणे ताणलेल्या धनुष्याबाणाप्रमाणे बनते. म्हणून त्याला पूर्ण धनुरासन असे म्हणतात. अर्ध धनुरासन व पूर्ण धनुरासनात विशेष असा फरक नाही. सामान्यत: यालाही धनुरासन असे म्हटले जाते. परंतु, सलग प्रयत्न केल्यावर जेव्हा हे आसन सिद्ध होते तेव्हा त्याला पूर्ण धनुरासनचा आकार प्राप्त होतो अर्थात ते पूर्णपणे ताणलेल्या धनुष्यबाणाप्रमाणे दिसते.

मकरासन अवस्थेत पोटावर झोपून दोन्ही पाय आणि हात हळूहळू कमरेकडे घेऊन जा. हनुवटी (दाढी) जमीनीवर टेकवा. पायाचा तळवा-पंजा आणि गुडघा एकत्र असावा. कोहनिया कमरेपासून सटकलेली असावी, दोन्ही हात वरच्या बाजूला ठेवा.

आता पायाला गुडघ्यात वळवा आणि दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याना घट्ट पकडून ठेवा. नंतर हात आणि पाय ताणून गुडघेही वर उचला. डोके मागील बाजूस पायाच्या तळव्यापर्यंत हळूहळू घेऊन जा. संपूर्ण शरीराचा तोल बेंबीपासून वरच सांभाळा. कुंभक करून या अवस्थेत 10 ते 30 सेकंदापर्यंत आपण राहू शकता.

पुन्हा त्याच स्थितीत येण्यासाठी प्रथम हनुवटी जमीनीवर टेकवून पाय आणि हाताला समांतर क्रमाने क्रमश: हळूहळू जमीनीवर या आणि पुन्हा मकरासन अवस्थेत झोपा आणि पूरक करा. श्वास-प्रश्वास सामान्य झाल्यावर दुसर्‍यांदा हे आसन करा. अशा प्रकारे तीन ते चार वेळा या आसनाची पुनर्रावृत्ती करा.

सावधगिरी : ज्या लोकांना मणक्याचा किंवा डिक्सचा अधिक त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये. गंभीर स्वरूपाचा पोटाचा आजार असला तरीही हे आसन करू नये.

लाभ: धनुरासन नियमित केल्याने पोटावरील अतिरिक्त चरबी घटते. या आसनाच्या माध्यमातून सर्वांचा व्यायाम होतो. गळयाचे आजारही होत नाहीत. पाचनशक्ती वाढते.
कंबर दूखणे बंद होऊन पोटाचे आजार दूर होण्यास मदत होते. महिलांची मासिक धर्मा संबंधी विकृतीही दूर होते. तसेच मूत्र विकाराचाही त्रास होत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे म्हणजे काय? का साजरा करतात जाणून घ्या

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

Show comments