परीक्षेच्या आधीचा अभ्यास : १. चांगली झोप घ्या. शारीरिक आणि मानसिक विश्रांती शिवाय एकाग्रता सुधारत नाही. थकलेले मन नीट लक्ष देऊ शकत नाही आणि वाचलेले नीट लक्षातही ठेवू शकत नाही.
२. प्रयत्नपूर्वक सूर्योदयाच्या वेळी उठा काही सूर्य नमस्कार घाला आणि त्यांनतर नाडीशोधन प्राणायाम, उज्जयी श्वास यासारखे काही श्वसनाचे व्यायाम करा.अशाप्रकारे तुमच्या शरीरातील आणि आणि मनातील ताण निघून जाऊन ऊर्जा वाढेल.
३. ध्यान हे अभ्यासाचे साधन म्हणून वापरा. रोज अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी काही मिनिटे कोणतेही सोपेसे ध्यान करत जा. त्याने त्याने मन हलके होऊन,मन विचलित न होता, पटपट शिकून ते जास्त काळ लक्षात ठेवले जाईल.
४. एकदा तुम्ही सुरवात करायला तयार झालात की बसून अभ्यासाला सुरवात करा. मग कुठलीही करणे सांगायला नको आणि अभ्यास पुढे ढकलायलाही नको.
५.
वेळाचे नियोजन करा : उजळणीचे वेळापत्रक आखा आणि त्यात अधून मधून विश्रांतीची वेळही ठेवा. गाणी ऐका,मित्र आणि कुटुंबियांशी गप्पा मारा. तुमच्या आवडत्या संगीतावर ३० मिनिटांपर्यंत नाच करा किंवा १० - १५ मिनिटे फिरून या. मग पुन्हा अभ्यासाला बसा. यामुळे तुम्ही केलेला अभ्यास आत्मसात होईल आणि एकाग्रताही वाढेल.
६. योग्य आहार घ्या : ताजे, हलके, घरी बनवलेले शाकाहारी अन्न खाल्यामुळे मन एकाग्र करण्याची तुमची क्षमता वाढेल आणि उर्जेत वाढ होईल. शिळे, आधीच पॅक् केलेले, खारवलेले, तेलकट किंवा गोड पदार्थ खाण्याने मंदपणा येतो.
७. काही मुले तुम्हाला भरीस घालतात तर काही तुम्हाला ‘ढ’म्हणतात. तुमची ध्येये तुमच्या मनात पक्की ठेवा आणि इतरांना त्याला धक्का लावू देऊ नका. हे तुमचे आयुष्य आहे आणि परिणामही तुमचे.
तर मन लावून अभ्यास करा आणि शांत रहा. अधिक माहितीसाठी क्लिक करा
आर्ट ऑफ लिव्हिंग
पुढील पानावर वाचा, परीक्षेच्या वेळेस काय करावे....
परीक्षेच्या काळात : १. परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्यापूर्वी मन शांत ठेवा. मेंदूवर अधिक भार टाकून स्वत:चा ताण वाढवू नका. त्यावेळी तुम्हाला आणखी अभ्यास करण्याची गरज नाही.
२. परीक्षेच्या वेळी तुम्हाला तणाव जाणवू लागला तर दीर्घ श्वास घ्या. तुमचा श्वास आंत आणि बाहेर जात असताना त्याकडे लक्ष द्या आणि तुमचा शांतपणा आणि संतुलन परत आल्याचे तुम्हाला जाणवेल.
३. प्रार्थनेच्या शक्तीला कमी लेखू नका. प्रार्थनेनेही तुमचे लक्ष केंद्रित करायला, एकाग्रता वाढवायला आणि चिंता घालवायला मदत होईल.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर म्हणतात, “योग्य आहार, शारीरिक व्यायाम यांच्या मदतीने मुलांना जास्त उत्साही रहाण्यास प्रोत्साहन द्या. त्यांच्या डोक्यावरचा भार कमी करा. पालक आणि इतर लोक यांनी मुलांवर दबाव आणू नये. जेव्हा मुले योग, ध्यान करतात, सर्जनशील आणि सर्वात मिमिळून खेळण्याचे खेळ खेळतात आणि स्पर्धात्मक खेळ टाळतात तेव्हा त्यांच्या उर्जेचा स्तर वर जातो.”