Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यक्तिमत्व विकासात उपयुक्तः ध्यान आणि योग

वेबदुनिया
मंगळवार, 1 मे 2012 (16:29 IST)
WD
भारतीयांना परंपरेने मिळालेल्या योग आणि ध्यान या देणग्या किती उपयुक्त आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, यावर आता जगन्मान्यतेची मोहोर उमटली आहे. योग आणि ध्यान वैयक्तिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अमेरिकेतील पेनिसिल्विनिया विद्यापीठाच्या संशोधकांना आढळले आहे.

ध्यानाद्वारे मेंदूला तीन माध्यमातून कसे एकाग्रचित्त करता येते याचा शोध त्यांना लागला आहे. याशिवाय ध्यानात राहूनही मेंदूला क्रियाशील कसे ठेवता येते हेही त्यांना कळले आहे.

यासाठी त्यांनी काही लोकांवर प्रयोग केले. त्यांना रोज महिनाभर तीस मिनिट ध्यान करावयास लावले. महिन्यानंर त्यांच्या मेंदूत घडलेल्या क्रियांचा अभ्यास केला. त्यांच्या मानसिक स्थितीचाही आढावा घेण्यात आला.

ध्यानामुळे या लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घ़डल्याचे त्यांच्या लक्षात आले. या अभ्यासाचा सविस्तर निष्कर्ष कॉग्निटिव्ह इफेक्टस एंड बिहेवियरल न्यूरोसायंस या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे म्हणजे काय? का साजरा करतात जाणून घ्या

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

Show comments