Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लॉक डाऊन मध्ये मुलांना सूर्य नमस्कार शिकवा प्रतिकारक शक्ती वाढेल.

Webdunia
बुधवार, 12 मे 2021 (18:47 IST)
कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक आहे. हे टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत, आजारपण टाळण्यासाठी तरूण, प्रौढ आणि वृद्ध पुरुषांना सतर्क केले जात होते. परंतु येत्या तिसर्‍या लाटेतही मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तली जात आहे.
या विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. तरी आता तीच गोष्ट मुलांवर देखील लागू आहे. यासाठी त्यांना घरात असताना सूर्यनमस्कार करायला शिकवा. चला सूर्य नमस्कार करण्याचे फायदे जाणून घेऊया.
 
सूर्य नमस्कार नेहमी सूर्याच्या दिशेने करावे.या मुळे  सूर्यापासून ऊर्जा देखील मिळते आणि रोग प्रतिकारशक्ती पातळी वाढवते. सुरुवातीला, मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार हे केले पाहिजे. नंतर हळू हळू वाढवा. त्याचबरोबर सूर्यनमस्काराचा वेग देखील वाढवा.
 
* दररोज सूर्याकडे तोंड करून सूर्य नमस्कार केल्याने शरीरात  व्हिटॅमिन डी मिळत. या मुळे हाड देखील मजबूत होतात. 
 
* हे दररोज केल्याने आळस आणि निद्रानाश सारख्या समस्या दूर होतात.
 
* सूर्य नमस्कार केल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम एकाच वेळी होतो. या मुळे शरीरात ताजेपणा अनुभवतो.
 
*  हा योग तरुण वयात केल्याने शरीरात लवचिकता कायम राहते.
 
* बरीच मुलं लहानपणापासूनच खूप लठ्ठ असतात, कालांतराने त्यांचा स्थूलपणा वाढतच जातो. सूर्य नमस्काराच्या साहाय्याने कमी वयात देखील वजन कमी केले जाऊ शकते. 
 
* सूर्य नमस्कार फुफ्फुस आणि बरगड्यांच्या स्नायूंना बळकट करते. 
 
* सूर्य नमस्कार 12 आसनांनी बनलेले आहे. म्हणून हे सर्व वयोगटातील लोक करू शकतात. 
 
* सूर्यनमस्कार केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीतपणे वाहतो.
 
* सूर्य नमस्कार केल्याने त्वचेशी संबंधित आजारांपासून देखील मुक्तता मिळते. 
 
* लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
 
सुरवातीला, मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कार करवावे.
 
- कृपया योग तज्ञांशी चर्चा करा.
 
- एखादा गंभीर आजार असल्यास सूर्य नमस्कार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सूर्य नमस्कार करा.
 
- सुरवातीला सूर्यनमस्काराची प्रत्येक क्रिया काळजीपूर्वक आणि आरामात करा. 
 

संबंधित माहिती

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

पुढील लेख
Show comments