Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

निद्रानाशापासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन करा, शांत झोप घ्या

Yoga to improve sleep quality
, शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (21:30 IST)
रात्री चांगली झोप न लागणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात जसे की ताण, चुकीची दिनचर्या, आहार किंवा शारीरिक हालचालींचा अभाव. झोपेच्या समस्यांवर मात करण्यासाठी, तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करून आराम मिळवू शकता.

निद्रानाश टाळण्यासाठी, झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपपासून दूर रहा. रात्री हलके स्ट्रेचिंग करा. याशिवाय तुम्ही गरम दूध किंवा हर्बल चहाचे सेवन करू शकता. रात्रीच्या जेवणात हलके जेवण घ्या. वेळेवर झोपण्याची आणि सकाळी वेळेवर उठण्याची सवय लावा.अनिद्राचा त्रास असल्यास हे काही योगासन केल्याने फायदा मिळू शकतो. चला जाणून घेऊ या.
सुप्त बद्ध कोणासन: 
हे योगासन केल्याने मज्जासंस्था शांत होते आणि निद्रानाशाचा त्रास नाहीसा होतो.
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा आणि पाय दुमडून तळव्यांना एकमेकांशी जोडून घ्या. हातांना सैल सोडून दीर्घ श्वास घ्या. हे आसन 5 ते 10 मिनिट करा. 
विपरीत करणी
हे आसन रक्तविसरण सक्रिय करते आणि मेंदूला शांत करते. हे आसन करण्यासाठी भिंतीच्या जवळ झोपा आणि दोन्ही पाय भिंतीवर टेकवा.हात बाजूला ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या 5 ते 10 मिनिट याच स्थितीत रहा.
 
बालासन-
हे आसन मेंदूला शांत करते आणि ताण कमी करते. हे आसन करण्यासाठी गुडघ्यावर बसून  हातांना पुढे वाकवा. कपाळ जमिनीवर टेकवा आणि दीर्घ  श्वास घ्या. 1 ते  2 मिनिट अशाच स्थितीत रहा.
शवासन -
हे आसन मेंदूला विश्रांति देते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा आणि संपूर्ण शरीर सैल सोडा. श्वास हळूहळू घ्या आणि मनाला शांत करण्याचे प्रयत्न करा. 5 ते 10 मिनिट अशाच स्थितीत रहा.
 
अस्वीकरण: आरोग्य, सौंदर्य काळजी, आयुर्वेद, योग, धर्म, ज्योतिष, वास्तु, इतिहास, पुराण इत्यादी विषयांवर वेबदुनियामध्ये प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ सार्वजनिक हित लक्षात घेऊन तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याची सत्यता पुष्टी करत नाही. कोणताही प्रयोग करण्यापूर्वी, कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.
 Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेनालीराम कहाणी : जांभई दिल्याबद्दल शिक्षा