Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंबरदुखी दूर करतील हे 3 योग स्टेप्स

Webdunia
मंगळवार, 27 जुलै 2021 (11:58 IST)
एका वयानंतर कंबरदुखी हा कायमचा आजार बनतो. बर्‍याच गोष्टी घडतात की काम करत असताना आपण त्याच स्थितीत बसून राहतो, ज्यामुळे ही समस्या उद्भवते. ही शक्यता तेव्हा देखील उद्भवते जेव्हा आपलं पोटाचा आकार मोठा झाला असेल. पाठदुखीचा त्रास कोणत्याही वेळी गंभीर स्वरुपाचा असू शकतो. म्हणूनच पाठीचा त्रास टाळण्यासाठी या 3 स्टेप्स अमलात आणाव्या.
 
स्टेप 1- दोन्ही पाय किंचित उघडा आणि समोर पसरवा. दोन्ही हात खांद्यासमक्ष असू द्या. मग डाव्या पायाचे बोट उजव्या हाताने धरून ठेवा आणि डावा हात मागील बाजूला सरळ ठेवा, मान देखील डावीकडे फिरवत मागे वळून पहाण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे दुसर्‍या बाजूनेही करा.
 
स्टेप 2- दोन्ही हाताने विपरित हाताचे मनगट धरुन डोक्यामागे घेऊन जा. श्वास घेत उजव्या हाताने डाव्या हाताला उजव्या बाजूने  डोक्यामागे खेचा. मान आणि डोके स्थिर ठेवा. मग श्वास सोडत हात वर न्या. त्याचप्रमाणे ही क्रिया दुसर्‍या बाजूने देखील करा.
 
स्टेप 3- गुडघे आणि हाताच्या तळव्या वर बसून जा जसे की बैल किंवा मांजर उभा असतो. आता पाठ वरील बाजूला खेचून मान झुकवत पोटाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. मग पोट आणि पाठ मागील बाजूला खेचा आणि मान वर करा आणि आकाशाकडे पहा. ही प्रक्रिया 8-12 वेळा करा.
 
फायदे: या व्यायामामुळे कंबर दुखीपासून आराम मिळतो आणि पोट निरोगी राहतं. कंबरेची वाढलेली चरबी दूर होण्यास मदत होते. परंतु ज्यांना पाठदुखीचा अधिक त्रास असेल किंवा पोटात गंभीर तक्रारी आहेत, त्यांनी हा व्यायाम करू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

फाटलेले ओठ फुलांपेक्षा गुलाबी होतील, नारळाच्या तेलात मिसळून लावा या गोष्टी

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी रोटीच्या पिठात हे मसाले मिसळा

Kiss day wishes in Marathi 'किस डे'च्या शुभेच्छा

१३ फेब्रुवारी किस डे: किस करण्यापूर्वी जाणून घ्या या ७ टिप्स

जर तुम्हाला हॅपी किस डे साजरा करायचा असेल तर काय खावे काय नाही हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments