Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

COVID 19 : योग करुन घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची, जाणून घ्या

COVID 19 : योग करुन घरी ऑक्सिजनची पातळी कशी वाढवायची, जाणून घ्या
, गुरूवार, 29 एप्रिल 2021 (14:12 IST)
कोरोना व्हायरस (coronavirus) संसर्गामुळे फुफ्फुस कमकुवत होतात. या काळात जेथे इम्युनिटी पॉवर (Immunity power) वाढवणे आवश्यक आहे तसेच फुफ्फुस

(Lungs) सुरक्षित आणि मजबूत असणे देखील गरजेचे आहे आणि सर्वात आवश्यक आहे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवणे. ऑक्सिजन (Oxygen) ची पातळी कमी झाल्यावर सर्वात वाईट प्रभाव आमच्या रोग प्रतिकारक शक्तीवर पडतो. अशा परिस्थितीत कोणताही व्हायरस (Virus) आणि बॅक्टेरिया (Bacteria) शरीरावर लवकर परिणाम करतात. अशात कुठलीही गंभीर समस्या नसल्यास घरातच योगाच्या काही टिप्स अमलात आणून आपल्या ऑक्सिजनची पातळी वाढवून आपण आराम मिळवू शकता.
 
नोट : कोरोना रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योगासान करावे.
सर्व प्रथम, आपण हवेशीर खोलीत रहावे, म्हणजेच जेथे सूर्य आणि हवेचा प्रवाह आहे.
 
1. अनुलोम विलोम : प्राणायाम करताना 3 क्रिया करतात- 1. पूरक, 2. कुंभक आणि 3.रेचक. याला हठयोगी अभ्यांतर वृत्ती, स्तम्भ वृत्ती आणि बाह्य वृत्ती म्हणतात. हेच अनुलोम आणि विलोम आहे. हेच नाडीशोधन प्रणायामाची प्रारंभिक क्रिया आहे. ते 5 ते 10 मिनिटांच्या क्षमतेनुसार केले पाहिजे.
 
(1) पूरक- अर्थात नियंत्रित वेगाने श्वास खेचण्याच्या क्रियेस पूरक असे म्हणतात. श्वास हळू-हळू किंवा जलद गतीने दोन्ही प्रकारे जेव्हा खेचतात तेव्हा त्यात लय आणि अनुपात असणे आवश्यक आहे.
 
(2) कुंभक- आत खेचलेला श्वास क्षमतेनुसार धरुन ठेवण्याच्या ‍क्रियेला कुंभक म्हणतात. श्वास आत धरुन ठेवण्याच्या क्रियेला आंतरीक कुंभक आणि श्वास सोडून पुन्हा न घेत काही वेळ थांबण्याची क्रिया बाह्य कुंभक म्हणून ओळखली जाते. यात देखील लय-अनुपात असणे आवश्यक आहे.
 
(3) रेचक- आत घेतलेली श्वा नियंत्रित गतीने सोडण्याची क्रिया रेचक म्हटली जाते. श्वास हळू-हळू किंवा जलद गतीने दोन्ही प्रकारे जेव्हा खेचतात तेव्हा त्यात लय आणि अनुपात असणे आवश्यक आहे.
 
2. वायु भक्षण : अर्थात हवा खाणे. हवा जाणीवपूर्वक कंठातून अन्न नळीत गिळणे. ही हवा तातडीने डाकार म्हणून परत येईल. हवा गिळताना घश्यावर जोर येतो आणि अन्न नळीतून होत हवा पुन्हा परत जाते. ते 5 ते 10 मिनिटांच्या क्षमतेनुसार केले पाहिजे.
 
3. मकरासन : मकरासन पोटावर झोपून केल्या जाणार्‍या आसानांपैकी आहे. या आसानाच्या अंतिम अवस्थेत आमच्या शरीराची आकृती मगर सारखी होते. याद्वारे, श्वासाच्या हालचालीचा अडथळा संपतो आणि शांतता जाणवते.
 
दोन्ही पायात इतकं अंतर असतं की जमिनीला स्पर्श होता कामा नये. छाती जमिनीवर उचलेली असते. दोन्ही हातांची कातरी सारखी आकृती करुन डोकं मधोमध ठेवतात.  
 
श्वास-प्रश्वास स्वाभाविक अवस्थेत होतं. हे 5 ते 10 मिनिट क्षमतेनुसार करावं. हे आसान अनेक प्रकारे केलं जाऊ शकतं. आपण आपले कोपर जमिनीवर आणि हाताने हनुवटीला आधार देऊन खोल खोल श्वास प्रश्वास घेऊ शकता. 
 
लाभ : मकरासन आरामदायक आसन अंतर्गत येतं. जेव्हा ही पोटावर पडत हे आसान केलं जातं तेव्हा श्वास-प्रश्वासाची गती वाढते, त्या श्वास-प्रश्वासाची दृष्‍टी स्वाभाविक अवस्थते आणण्यासाठी मकरासनाचा अभ्यास केला जातो. या दरम्यान आपण लांब श्वास घ्या आणि सोडा. असे केल्याने फुफ्फुसे पूर्णपणे कार्य करु लागतात आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी मेंटेन राहते.
 
दुसरीकडे, हवा खाणारी क्रिया फूड पाईप शुद्ध करते आणि मजबूत करते. यामुळे फुफ्फुस शुद्ध आणि मजबूत देखील होतात. ही क्रिया शुद्ध वार्‍यात करावी आणि पण घशात कोणत्याही प्रकाराची समस्या नसावी. याच प्रकारे अनुलोम - विलोम केल्याने मनातील भीती आणि ताण दूर होण्यास मदत होते आणि सर्व प्रकाराच्या नाड्यांना आरोग्य लाभतं. याने फुफ्फुसात साचलेली घाण बाहेर पडते आणि फुफ्फुस मजबूत बनतात.
 
नोट : कोरोना रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शब्दाची नाही गरज, येतं नृत्यास बांधता!