दररोज आपल्याला योग केले पाहिजे. योगाच्या माध्यमाने आपल्या शरीरातील सर्व विकारांवर मात करता येते. योगाचे नियमित सरावाने शरीरातील चरबी कमी करता येते. तसेच अनेक रोगांपासून मुक्तता होते.
बऱ्याच योगासनांमधील हे एक मत्स्यासन बऱ्याच आजारामध्ये रामबाणाच काम करतं. या आसनात शरीर मासोळीच्या आकाराचं बनतं. यामुळे त्याचे नाव मत्स्यासन देण्यात आले आहे.
मत्स्यासन कसे करावे :
हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर आसन किंवा चटई घालून बसून घ्या. मग पायांना पद्मासनात ठेवून मागील बाजू झोपा. या स्थितीमध्ये राहून श्वास आत घेत कंबरेला उंच उचला. या मुद्रेत असताना लक्ष द्या की आपल्या शरीरातील नितंब आणि डोकं हे खालीच जमिनीवर ठेवायचे आहे. पण कंबर जमिनीला स्पर्श करता कामा नये. या क्रियेला आपल्या सामर्थ्यानुसार एक ते पाच मिनिटापर्यंत हळू-हळू वाढवा. आपल्याला इच्छा असल्यास सुरुवातीला जमिनीवर सरळ झोपून पायांना पद्मासनाच्या स्थितीत आणू शकता.
आसनाचे फायदे :
मत्स्यासन केल्यानं सर्व शरीरास बळ मिळतं. पोटाशी निगडित सर्व आजारांमध्ये आराम मिळतो. तसेच पोटाची चरबी कमी होते. श्वास घेण्यात मदत होते. गळा स्वच्छ होतो. डोळ्यांच्या प्रकाश वाढतो. एखाद्या माणसाला त्वचेसंबंधित आजार असल्यास त्याला या आसनांपासून फायदा होतो. हे आसन दररोजच्या पचनाच्या त्रासाला देखील दूर करतं. तसेच बायकांमध्ये होणाऱ्या मासिक पाळीच्या तक्रारींना देखील या आसनाच्या मदतीने दूर करतात.