Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

बोटांमध्ये वेदना कमी करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

Fingers
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 (21:30 IST)
मोबाईल, लॅपटॉप वापरल्याने आणि सतत टायपिंग केल्याने हात आणि बोटांमध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. याशिवाय, संधिवात, मज्जातंतूंच्या समस्या, दुखापत किंवा अशक्तपणामुळे देखील बोटांमध्ये कडकपणा आणि वेदना होऊ शकतात. या वेदना कमी होण्यासाठी काही योगासन केल्याने फायदा मिळू शकतो. वेदना असहनीय असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
बोटांमध्ये वेदना होण्याची मुख्य कारणे
जास्त टायपिंग किंवा मोबाईल वापर
संधिवात किंवा सांधेदुखी
मज्जातंतूंचे आकुंचन किंवा रक्ताभिसरण समस्या
कार्पल टनेल सिंड्रोम (CTS)  
कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता
हे काही योगासन केल्याने हाताच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. 
हस्त उत्तानासन -
हे एक प्रभावी योगासन आहे. हे योगासन हात आणि बोटांच्या स्नायूंना आराम देते आणि रक्ताभिसरण वाढवते. 
हे करण्यासाठी सर्वप्रथम सरळ बसा आणि दोन्ही हात पुढे करा.
हाताचे तळवे वरच्या दिशेने वळवा आणि बोटे हळूहळू उघडा आणि बंद करा.
अंजली मुद्रा 
हे बोटांचा कडकपणा दूर करते आणि लवचिकता वाढवते.
हे करण्यासाठी सर्वप्रथम सरळ बसा आणि दोन्ही हात जोडून नमस्काराची मुद्रा करा. 
हातांचे  तळवे एकमेकांवर हळूवारपणे दाबा आणि बोटे ताणून घ्या. 
10 ते 15 सेकंद याच स्थितीत रहा.
 
मकरासन -
हे आसन केल्याने मनगट आणि बोटांमधील वेदना कमी होण्यास मदत होते.
हे करण्यासाठी सर्वप्रथम पोटावर झोपा अणि हातांना समोर पसरवा.
बोटांना ताणून घ्या आणि काही सेकंद स्ट्रेच करुन ठेवा. 
हातांना रिलेक्स करा.
 
प्राणमुद्रा 
हे आसन केल्याने हाताची ऊर्जा वाढते आणि बोटांचा कडकपणा दूर होतो. 
हे करण्यासाठी सर्वप्रथम हातांना गुडघ्यावर ठेवा.करंगळी आणि अनामिका अंगठ्याने जोडा. बाकी बोटे सरळ ठेवा आणि 5 ते 10 मिनिटे याच स्थितीत रहा.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री गजानन महाराजांसाठी गोड नैवेद्यात बनवा राजभोग मिठाई