Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाठीचा कणा बळकट करतो मेरुदंडासन इतर फायदे जाणून घ्या

पाठीचा कणा बळकट करतो मेरुदंडासन इतर फायदे जाणून घ्या
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (17:31 IST)
निरोगी राहण्यासाठी चांगला आणि निरोगी आहारासह योगा करणे देखील खूप महत्वाचे आहे. योगासन केल्याने शरीरात चपळता येते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. मन शांत होण्यासह आजारापासून देखील संरक्षण होत. या योगासनांमध्ये मेरुदंडासन योग खूप फायदेशीर मानले आहे. ह्याच्या नावाबद्दल बोलायचे झाले तर मेरुदंडासन मेरुदंडाने बनले आहे. ह्याचा अर्थ आहे पाठीचा कणा. हे योग केल्यानं पाठीचा कणा बळकट होतो. तसेच पोटाचे विकार दूर होऊन वजन नियंत्रित राहण्यात मदत मिळते. चला तर मग ह्याच्या फायद्यां विषयी जाणून घेऊ या.
 
कस करावं -
* सर्वप्रथम मोकळ्या जागेत चटई घालून त्यावर बसा.
* पाठीचा कणा सरळ करून पाय पुढे सरळ करा.
* दोन्ही हात मांडीवर ठेवा आणि पाय पसरा.
* किंचित वाकून हाताच्या मदतीने दोन्ही पायाचे अंगठे धरण्याचा प्रयत्न करा.  
* हळुवार पणे हाताच्या मदतीने दोन्ही पाय वर उचला.
* अशा स्थितीत काही सेकंद तसेच राहून दीर्घश्वास घ्या.  
* सामान्य स्थितीमध्ये येऊन या प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.  
 
या योगासनांच्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या -
1 पाठीचा कणा बळकट होतो-
हे आसन केल्यानं पाठीचा कणा सरळ होऊन मजबूत होतो. या मुळे शरीरात लवचिक पणा येऊन दुखापतीची शक्यता कमी होते. तसेच उठण्या-बसण्याच्या त्रासातून आराम मिळतो.
 
2 पाठदुखी पासून सुटका-
हे आसन केल्यानं पाठीचा कणा बळकट होऊन लवचिकपणा येतो. अशा मध्ये पाठदुखी पासून आराम मिळतो.  
 
3 स्नायू बळकट होतात-
हे आसन केल्यानं पाठ, खांदे, पाय, आणि स्नायू बळकट होतात. विशेषतः जे लोक एकाच जागी बसून काम करतात त्यांच्या साठी मेरुदंडासन केल्यानं त्याचा फायदा होतो.
 
4 उत्तम पाचक प्रणाली -
शरीराच्या इतर भागांसह पोटाचे स्नायू देखील बळकट होतात. पचन प्रणाली चांगली झाल्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, सूज येणं या सारख्या  त्रासापासून आराम मिळतो.  
 
5 वजन नियंत्रणात राहतो- 
दररोज हे आसन केल्यानं शरीराला मजबुती येते. अशा परिस्थितीत वजन वाढण्याच्या समस्येपासून देखील सुटका मिळेल. म्हणून वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मेरुदंडासन योग करणं हा उत्तम पर्याय आहे.
 
6 ताण कमी होईल -
आजकाल प्रत्येक माणूस तणावामुळे ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत हे आसन केल्यानं शरीरात चपळता संचारित होईल तसेच मन शांत होऊन तणाव कमी होण्यात मदत मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॉकलेट डे स्पेशल कविता