Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PAK vs SL Asia Cup:पाकिस्तानचा श्रीलंकेकडून पाच गडी राखून दारुण पराभव, आता रविवारी अंतिम सामना

Webdunia
शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (23:17 IST)
आशिया चषक 2022 च्या सुपर-फोरच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 122 धावांचे लक्ष्य दिले होते जे त्यांनी 17 षटकांत पूर्ण केले. आता 11 सप्टेंबरला याच मैदानावर या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. 
 
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि दोन धावांच्या बेरजेवर त्यांनी दोन खेळाडू गमावले.  सर्वप्रथम मोहम्मद हसनैनने कुसल मेंडिसला (0) बाद केले. त्यानंतर दनुष्का गुणतिलकही खाते न उघडता हरिस रौफची बळी ठरली . नंतर रौफनेही धनंजय डी सिल्वाला बाद करत 29 धावांवर तीन गडी बाद केले. 
 
सलामीवीर पथुम निसांका आणि भानुका राजपक्षे यांनी 51 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला संकटातून सोडवले. उस्मान कादिरने बाद होण्यापूर्वी राजपक्षेने दोन षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. येथून श्रीलंकेचा विजय ही निव्वळ औपचारिकता होती, ती निसांका आणि कर्णधार दासून शनाका यांनी सोपी करून दाखवली.पथुम निसांकाने 48 चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद 55 धावा केल्या. त्याच दासुन शनाकाने 21 धावा केल्या. पाकिस्तानकडून हसनैन आणि रौफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 
 
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि चौथ्या षटकात मोहम्मद रिझवानची (14) विकेट गमावली. 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments