Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मासिक राशीफल सप्टेंबर 2021

monthly rashifal 2021 september
Webdunia
मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (23:41 IST)
मेष 
विनाकारण भीती, चिंता राहिल. स्वाभावानुसार चुका होतील. जुनी वाद, मतभेद वाढून डोके दुखी वाढेल. सहयोग, मार्गदर्शन कमी आल्याने अडचणी निर्माण होतील. व्यापारात अचानक फायदा होईल. विरोधक शांत बसतील. कुटुंबातील वाद संयमाने सोडवता येतील. सामाजात प्रतिष्ठा मिळेल. एखाद्या चांगल्या कामावर खर्च होईल. या महिन्यात आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील. 
 
वृषभ   
महिन्याच्या सुवातीलाच दुखणी डोके वर काढतील. दूर्लक्ष करू नका. गंभीर आजार होण्याची शक्यता संभावते. वाहन, मशीनरी यांच्यापासून अपघात संभवतो. किमती वस्तूची काळजी घ्या. लहान- लहान चुका मोठे नुकसान करू शकतात. आर्थिक चणचण भासू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शक्यता आहे. 
 
मिथुन  
आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. ध्येर्याने काम घ्यावे लागेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुभवामुळे काम झटपट हातावेगळं कराल. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर या महिन्यात आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. 
 
कर्क 
उत्साह देणारा काळ राहिल. लहान सहान गोष्टीत अडकून राहू नका. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा. या महिन्यात अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा.
 
सिंह 
समस्याच्या मालिकांना तोंड द्यावे लागणार आहे. आर्थिक प्रकरणात मोठे नुकसान होण्याची शक्यता दर्शविते. आरोग्यविषयी चिंता सतावेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग पडेल. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शक्य आहे.
 
कन्या 
प्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी होईल. पुढे जाण्‍याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल. या महिन्यात कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल.
 
तूळ 
प्रगती मिळवून देणारा काळ आहे. अथक परिश्रम घ्यावे लागतील. महत्त्वाच्या कामात कोणावर विश्वास ठेवू नका. आळस टाळा. कुटूंबात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कार्यात, यश, प्रतिष्ठा मिळेल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. नोकरी, रोजगार बदलता येईल. तुम्हाला आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवावा लागणार आहे. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक पक्षाबाबत संपूर्ण महिना सावध राहावे लागणार आहे. 
 
वृश्चिक 
वेळेच भान ठेवावे लागेल. शांती, सहयोग, समाधानाने कार्य करावे लागेल. व्यापार-व्यवसाय नुकसान संभवते. गणपती बनवायला जात तर तेथे हनुमान बनेल, अर्थात कामे बिगडण्याची शक्यता आहे. जुनी वाद वाढण्याची शक्यता आहे. खरेदी, विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. विरोधक वाढतील. स्वभावावर नियंत्रण राखावे लागले. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावे लागतील. काही प्रेमपूर्ण अनुभव या महिन्यात येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल.
 
धनू 
अधिक उताविळपणा करू नका. तुमच्या विषयी असंतोष पसरेल. चिंता वाढेल. विचार कराल काही व होणार दुसरेच. व्यापारातील स्पर्धा टाळा. कर्ज काढू नका. खरेदी विक्रीच्या व्यवहारापासून सावध रहा. कटु अनुभव येणाचा संभव आहे. नुकसान झाले तर स्वत:चा तोल जाण्‍याची शक्यता नाकारारता येत नाही. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे या महिन्यात आपल्यासाठी फलदायी आहे.
 
मकर 
प्रगतीचा आलेख कासवगतीने वर चढेल. आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे. आपल्या सहकार्‍यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.
 
कुंभ  
अनुभव उपयोगी पडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रगतीचा आलेख उंचावेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. इच्छा पूर्ण होतील. व्यापार व्यवसायात यश मिळेल. आवक चांगली राहिल्याने गुंतवणूक करू शकाल. नोकरीत प्रमोशन मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होईल. किमती वस्तू खरेदी करू शकाल. या महिन्यात आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. 
 
मीन 
पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. विरोधक अडचणी निर्माण करतील. कामाशी काम ठेवा. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.  सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मान-सम्मान मिळेल. आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shukra Pradosh शिवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या पद्धतीने करा शुक्र प्रदोष व्रताची पूजा

Vallabhacharya Jayanti 2025 कोण होते श्री वल्लभाचार्य ज्यांना स्वयं श्रीनाथजींने दिले होते दर्शन

२४ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळले जाईल, जाणून घ्या पौराणिक कथा

आरती गुरुवारची

अक्षय्य तृतीयेला १० रुपयात खरेदी करा यापैकी एक वस्तू, देवी लक्ष्मी तुमच्यावर पैशांचा वर्षाव करेल

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments