Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंक ज्योतिष : मूलांक 3 भविष्यफळ 2021

Webdunia
सोमवार, 21 डिसेंबर 2020 (13:24 IST)
मूलांक 3 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 3
जर आपला जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल तर मूलांक 3 आहे, ज्याचा स्वामी गुरु ग्रह आहे. वर्ष 2021 ज्याचे मूलांक 5 आहे जे बुध ग्रहाशी निगडित आहे. मूलांक 3 हे ज्ञानाचे घटक गुरु चे आहे ज्यामुळे आपल्याकडे नवीन नवीन कल्पना आणि विचार येतात. आपण संवाद, कला आणि उत्साहाने परिपूर्ण आहात. आपल्याला खेळ आणि करमणूक प्रेरणा देतात, ज्यामुळे आपण सर्जनशील असतात. आपण हातात घेतलेले काम पूर्ण करून त्यामध्ये आपले ज्ञान आणि विचारांची भर टाकून जिवंत करता. वर्ष 2021 चा मूलांक 5 आहे, हे बुधाचे अंक आहे. ज्यामुळे हे संपूर्ण वर्ष आपल्याला सतत काही न काही करण्याची प्रेरणा देईल आणि आपण नवीन संधीचा फायदा घेऊन या वर्षात आपल्या आयुष्याला नवे आयाम द्याल.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 3 च्या लोकांसाठी वर्ष 2021 नवी कामे आणि पूर्वीच्या कामांना नवे रूप देणारे असेल. कारण हे येणारे वर्ष आपल्या साठी नवीन योजनांसह सुवर्ण संधी देखील घेऊन येणार आहे. 2021 मध्ये आपलं डोकं आणि ज्ञान दोन्ही आपला साथ देतील. एप्रिलनंतर नवीन ऑफर मिळतील, त्यामुळे आपल्याला व्यवसायात फायदा होईल. ऑगस्टच्या नंतर आपण काही नवीन करण्याचा विचार कराल. पण हे काम भागेदारीने करू नका. नोकरदार वर्गांसाठी हे वर्ष त्यांच्या कामाचे कौतुक करण्याचे राहील कारण या वर्षात आपला बुद्धीचा प्रवाह चांगला राहील. या साठी आपल्या मनात नवीन कल्पना येतील. आपण नोकरीच्या शोधात आहात तर या वर्षात नवी नोकरीची संधी मिळेल. नोकरी करत असणाऱ्यांना पदोन्नती आणि बढती मिळण्यासाठी हे वर्ष चांगले आहे.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
आर्थिक दृष्ट्या मूलांक 3 साठी हे वर्ष चांगले जाणार आहे. आपल्याकडे पैसा येईल आणि आपण तो खर्च देखील तसाच कराल. या वर्षी आर्थिक कमतरता होणार नाही आणि होईल तर त्याची पूर्णता वेळीच होईल. या वर्षात आपल्याला कर्ज घ्यावयाचे असेल तर एप्रिल महिन्याच्या पूर्वी किंवा सप्टेंबर नंतर प्रयत्न करा. आपण दिलेले पैसे परत घेण्यासाठी देखील हे वर्ष चांगले आहे. वर्षाच्या सुरुवातीला आपण शेअर बाजारात गुंतवणूक कराल. जमिनीशी निगडित केलेला व्यवहार आपणास फायदा देईल. 
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 3 च्या लोकांसाठी हे वर्ष 2021 नाते संबंधासाठी चांगले जाईल, आपण एकटे आहात तर या वर्षात आपल्या आयुष्यात इच्छित जोडीदार मिळेल. नात्यात वैचारिक मतभेद असेल तर वेळीच सांभाळा. तेव्हाच आपण आपले प्रेम व्यक्त करू शकाल. आपण प्रेमात असाल तर आपल्या जोडीदारासह चांगला वेळ घालवाल. आपल्या अहंकाराला आपल्या नात्याच्या मध्ये येऊ देऊ नका. वर्ष 2021 मध्ये विवाहित लोकांची नाते सुधारतील. आपण जोडीदारासह वेळ घालवाल. जुन्या तक्रारी दूर होतील. वर्षाच्या मध्यकाळात आपल्याकडून काही गैरसमज होतील जे संबंधावर परिणाम करतील. आपल्याला प्रेमाने आपले विवाहित जीवन सांभाळावे लागेल. 
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 3 च्या लोकांसाठी हे सुरुवातीचे वर्ष खूप चांगले जाणार आहे. आपण आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगाल आणि स्वतःची काळजी घ्याल. पूर्वीच्या काही समस्या असतील तर त्यापासून सुटका होईल. परंतु या वर्षाच्या मध्यकाळात एकाएकी पोटाचा किंवा छातीचा त्रास उद्भवेल ज्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करावयाचे नाही. कोणतेही त्रास झाल्यावर लगेच त्यावेळी उपचार घ्यावे लागतील वर्षाच्या अखेरीस आपले आरोग्य चांगले राहील आणि आपण स्वतःला तंदुरुस्त अनुभवाल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शनि त्रयोदशी 2024 पूजा विधी, साहित्य आणि मंत्र

आरती शुक्रवारची

Coconut Remedies: व्यवसायात नुकसान झाले असेल तर नारळाच्या उपायाने पैसे परत मिळवा

शनि त्रयोदशीच्या दिवशी शनिदेवाला या गोष्टी अर्पण करा, साडेसाती आणि ढैयाच्या दुष्परिणामांपासून मुक्ती मिळेल

श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments