Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंक ज्योतिष : मूलांक 6 भविष्यफळ 2021

Webdunia
मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (09:21 IST)
मूलांक 6 आणि अंक शास्त्र भविष्य वर्ष 2021
मूलांक 6
ज्यांचा जन्म 6, 15 किंवा 24 तारखे ला झाला आहे त्यांचा मूलांक 6 असतो. ह्याचा स्वामी शुक्र ग्रह आहे. हे सौम्य आणि आकर्षित करणारे ग्रह आहे. हा मूलांक 6 भौतिक सुख, सौंदर्य आणि धनाचा घटक आहे. हा अंक कौटुंबिक आणि प्रेम प्रधान असतो. या लोकांना सर्वांच्या सह राहणे आणि काम करणे आवडते. आपण लवकर मैत्री करता आणि आपल्याला त्यांच्या सह वेळ घालविणे आवडते. आपल्याला संगीत, कला आणि सुंदर वस्तूंची आवड असते. आपले वाद झाल्यावर आपण खूप संवेदनशील होता आणि आपल्याला एकाकी पणा जाणवू लागतो. एखाद्या वर प्रेम करता आणि त्याने आपले मन दुखावले तर आपल्याला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. हे वर्ष या मूलांकासाठी खूप मजेत जाणारा आहे. आपल्या कार्याला संतुलित ठेवा अन्यथा तोटा संभवतो. 
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
करिअरच्या दृष्टीने हे वर्ष सकारात्मक राहील आणि हे आपल्याला शिकवेल की कुटुंबाच्या शिवाय आपला वेळ कामात कसा घालवता येऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हे वर्ष 2021 नवीन संधी घेऊन येत आहे. या संधीला गमावू नका. कारण मजा करणे हे आपल्या कामात व्यत्यय आणू शकतो. हे वर्ष आपल्या व्यवसायासाठी खूप चांगले राहील. या साठी आपल्याला एखादे कर्ज घ्यावयाचे असेल तर आपण घेऊ शकता. हे वर्ष परदेशी कामासाठी चांगले राहील. नोकरदार वर्गासाठी हे वर्ष बढतीचे मार्ग उघडत आहे. अधिकारी वर्गाच्या नजरेत देखील यश मिळविण्याची चिन्हे दिसून येत आहे. या वर्षात कामा निमित्त प्रवास होतील त्याचे परिणाम आनंददायी असतील. वर्षाच्या मध्यकाळात कार्यक्षेत्रात काही सहकारी लोकांमुळे त्रास संभवतात, या काळात जपून चालावे  लागेल. जर आपण बदली चा विचार करीत आहात तर वर्षाच्या अखेरीस बदली साठी चांगली वेळ आहे, ज्यामुळे आवडीच्या ठिकाणी बदली होईल. हा काळ नव्या नोकरीसाठी चांगला असेल.
 
आर्थिक दृष्ट्या कसे असणार हे वर्ष 2021 : 
आर्थिक दृष्टीने हे वर्ष या मूलांकासाठी शुभ असेल. आपले कोणतेही काम पैशाच्या अभावी थांबणार नाही. मागील वर्षाचे सर्व स्वप्न या वर्षी पूर्ण होतील. या वर्षात पगारात बढतीमुळे आपल्याला फायदा होईल. आपण घर आणि वाहन खरेदीचा विचार करीत आहात तर आपल्याला पैशाची कमी भासणार नाही. गुंतवणुकीसाठी कर्ज घेण्यात काहीच अडचण येणारं नाही. हे वर्ष शेअर बाजारासाठी चांगले राहील. जुने आणि अडकलेले पैसे देखील जुलै नंतर परत मिळतील. या वर्षात पालकांकडून आर्थिक मदत मिळेल. आपण बहीण-भावंडांना देखील आर्थिक मदत कराल. वर्षाच्या अखेरीस आपल्या मित्राला आर्थिक मदतीची गरज जाणवेल, आपण मदत केली तर ते पैसे परत येण्याची शक्यता नसेल. पैसे परत येण्याची अपेक्षा ठेवू नका.
 
प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
या मूलांकाचे लोकं आपल्या नात्याला घेऊन अत्यंत संवेदनशील राहतात, या वर्षी देखील त्यांचे व्यवहार काही असेच राहतील. आपल्या कुटुंबात आपण आपल्या नात्याबद्दल काहीसे अस्वस्थ व्हाल. कारण आपण आपल्या प्रिय व्यक्ती समवेत कमी वेळ घालवाल. कारण आपले काम त्यासाठी आपला साथ कमी देईल. आपण एकटे असाल तर वर्ष 2021 मध्ये आपण एकटे राहणार नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला इच्छित जोडीदार मिळेल. विवाहित लोकांसाठी हे वर्ष पूर्वीच्या वर्षापेक्षा चांगले असेल. आपण जोडीदारासह वेळ घालवाल आणि सर्व जुन्या तक्रारी आणि रुसवे-फुगवे संपतील. आपल्याला जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे. 
 
आरोग्यासाठी कसे असणार हे वर्ष 2021 : 
मूलांक 6 साठी हे वर्ष 2021 आरोग्याच्या दृष्टीने मिश्रित फळ देणारे राहील. आपण आपल्या कामांसह आपल्या आरोग्याची काळजी देखील घेतली पाहिजे. काही त्रास जाणवत असेल तर त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर आपल्याला पोटाशी निगडित काही त्रास आहे तर निष्काळजी पणा करू नका, खाण्या-पिण्याचे पथ्य सांभाळा. बाहेरचे खाणे कटाक्षाने टाळा. जून महिन्यानंतर एखाद्या अपघातामुळे दुखापत होऊ शकते. वाहन काळजीपूर्वक चालवा आणि रागाच्या भरात घरातून बाहेर जाऊ नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

श्री कृष्ण कवच

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

पुढील लेख
Show comments