Dharma Sangrah

साप्ताहिक राशीफल 18 ते 24 जुलै 2021

Webdunia
शनिवार, 17 जुलै 2021 (21:49 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढतील. यशस्वितेसाठी केलेले अथक परिश्रम वाया जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती अनुकूल होऊ शकेल. मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. इतरांकडून अपेक्षित असणारे सहकार्य वेळेवर मिळू शकेल व उत्साह वाढीस लागू शकेल.
 
वृषभ: सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीत असणारा वाद अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. इतरांकडून वेळेवर सहकार्य मिळण्यास विविध प्रकारच्या अडचणी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. मनावर काळजीचे सावट राहू शकेल. अंतिम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष दक्षता घेणे आवश्यक व उचित ठरेल. इतरांवर अधिक विश्‍वासून राहणे अहितकारक सिद्ध होऊ शकेल. मनावर काळजीचे सावट राहील.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात विरोधक मंडळीचा त्रास वाढेल. आरोग्याच्या जुन्याच समस्या त्रासदायक स्वरूपाने समोर येतील. शारीरिक दगदग व त्रास वाढण्याची शक्यता आहे. अंतिम चरणात नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विशेष काळजीपूर्वक स्वीकार करावा अन्यथा भावी काळात नुकसानकारक योगाची दाट शक्यता आहे. इतरांवर जास्त प्रमाणात विश्‍वासून राहणे भावी काळासाठी नुकसानकारक ठरू शकेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत काळजी राहील. स्पर्धा परीक्षेत अपेक्षितरीत्या यश मिळणे अवघड स्थितीतच राहू शकेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीचा त्रास राहील. त्यामुळे त्यांना बोट ठेवण्यास जागा रिक्त राहणार नाही. याची विशेष काळजी घेणे उचित ठरेल. काही बाबतीत जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात काही बाबतीत पारिवारीक सदस्य मंडळीबरोबर मतभेद निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. परिश्रम करूनही यश मिळणे शक्यतेच्या पलीकडेच राहील. मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात संततीबाबत असणार्‍या समस्याकडे दुर्लक्ष करू नये. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळाच्या दृष्टीने होणार्‍या परिणामाचा विचार करावा म्हणजे होणारे नुकसान टळू शकेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात इतरांकडून सहकार्य वेळेवर लाभेल. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहतील. काही बाबतीत दूर गेलेले यश जवळ येईल. अंतिम चरणात पारिवारीक वातावरण थोडे मानसिक अशांतता निर्माण करणारे राहण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरताच र्मयादित ठेवणे उचित ठरेल. होणारा मनस्ताप टळून उत्साह वाढेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती अस्थिर राहून आर्थिक आवक गरजेनुसार राहील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील. प्रवासात दगदग व त्रास वाढण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणूक काळजीपूर्वकच करणे योग्य ठरेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम वतरुळातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. तसेच सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद मिटण्याच्या मार्गी राहील.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत मनावर काळजीचे सावट राहील. मानसिक अशांतता जाणवेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे आवश्यक ठरेल. परिस्थिती अनुकूल व नियंत्रणात राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक आवक सर्वसाधारण राहील. काही प्रमाणात आर्थिक समस्याचा सामना करावा लागेल. इतरांवर अधिक विसंबून राहणे योग्य ठरणार नाही.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. इतरांकडून येणे असलेला पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहील. अंतिम चरणात परिस्थिती मनोनुकूल होण्याच्या मार्गावर राहील. मनावर असलेले काळजीचे दडपण कमी होण्याच्या स्थितीत येईल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामाबाबत चांगल्या घडामोडी घडतील.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनोनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. परिश्रम व दगदग करावी लागेल. अपेक्षित यश हमाखास मिळू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकुल राहील. त्यामुळे कोणत्याही बाबतीत सहसा अल्प प्रयत्नाने यश मिळणे अवघड राहील. मानसिक दडपण निर्माण करणारी ग्रहस्थिती प्रतिकुल आहे.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सर्व समस्या मिटतील व व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक समाधान लाभेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. आर्थिक मदतीचा ओघ इतरांकडून वेळेवर सुरूच राहू शकेल.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील व मनोनुकूल यश दृष्टिक्षेपात राहील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील. मानसिक आनंद वाढीस लागेल. अंतिम चरणात नोकरीत अधिकार वाढीसह बदली योग संभवतो. तसेच कला क्षेत्रातील व्यक्तीचा इतरांकडून यथायोग मानसन्मान सोहळा आयोजित केला जाईल. इतरांकडून मनोनुकूल स्वरूपाचे सहकार्य मिळून उत्साह वाढेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Parshuram Jayanti 2026 Wishes in Marathi परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

Basaveshwar Jayanti 2026 महात्मा बसवेश्वर: ८०० वर्षांपूर्वी 'लोकशाही' मांडणारा क्रांतीसुर्य!

Vinayak Chaturthi 2026 विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

नमश्शिवाय भुजंगम् Namashivaya Bhujangam

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

पुढील लेख
Show comments