Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणून घ्या कसा राहणार आहे ऑगस्ट 2022 तुमच्यासाठी

Webdunia
शनिवार, 30 जुलै 2022 (23:07 IST)
मेष : घरात नव्या पाहुण्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. नव्या लोकांवर डोळे मिटून भरवसा ठेवू नका. जुन्या समस्या नव्या रुपात तुमच्यासमोर उभ्या ठाकतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना. आपल्या धर्मस्थळात जाऊन प्रार्थना करा. महिन्याचा शेवट येता-येता चांगल्या परिस्थितीची सुरुवात होईल. 
 
वृषभ : आपल्या जीवनात नवा उत्साह आणि रंगांची उधळण होणार आहे. बहिणी-भावंडांचे साहाय्य जीवनात नवा आनंद निर्माण करेल. व्यापारात नवे यश आणि वृध्दी होईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. लॉटरीने फायदा होईल. भावुक होणे चांगले आहे, पण अती भावनिकता टाळा. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल.
 
मिथुन : जीवनात काही नवे घडेल. सामाजिक पातळीवर मान-सम्मान वाढेल. अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. अपत्याचे वागणे साहाय्यकारक ठरेल. व्यापारात यश येईल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल. वेळॆचा योग्य वापर करा. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल.
 
कर्क : जुन्या मित्रांच्या भेटी तुमच्या जीवनाला नवा रंग देतील. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. कुटुंबीय एका मजबूत भिंतीसारखे तुमच्यासोबत ठामपणे उभे राहतील. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही.
 
सिंह : आपल्या रचनात्मकतेचे कौतूक होईल. भौतिक साधनांवर पैसे खर्च होतील. मित्रांचे सहकार्य आपल्या जीवनाच्या गाडीला गतिमान करेल. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थी वर्गाला लाभ होईल. नोकरीत पुढे जाण्याची आशा आहे. आरोग्याप्रती सजग राहा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल.
 
कन्या : अडकलेले धन परत मिळेल. कोर्ट-कचेरीची प्रकरणे सुरळीत होतील. आनंदात वाढ होईल. मुलांच्या बाजूने काही तरी त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची तब्येत चिंताजनक असेल. विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.
 
तूळ : लक्षात ठेवा क्रोध तुमचे नुकसानच करतो. तुमच्या वाणीला नियंत्रणात ठेवा. तुमच्या कुठल्यातरी गोष्टीवर तुमचा जोडीदार नाराज होऊ शकतो. कुठल्यातरी दुर्घटनेची शक्यता तयार होत आहे, यामुळे अतिरिक्त सावधानी बाळगा. नव्या कामाची सुरुवात करण्याआधी प्रत्येक पैलूची आधीच माहिती मिळवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरींपासून दूर राहणे ठीक होईल. कोणालाही उधार देणे टाळा, कारण यात तुमचे पैसे बुडू शकतील.
 
वृश्चिक : वेळ बदलत आहे. १५ तारखेनंतर परिस्थिती चांगली होईल. तब्येत उत्तम राहील. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे. बॉससोबतचे संबंध सुधारतील. शत्रू शांत राहतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल.
 
धनु : आळशीपणा दारिद्रयाचे दुसरे नाव आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तुमचे चालढकलीचे वागणे तुमचे यश रोखू शकते. अधिकारीही तुमच्या या वागण्याने नाराज होऊ शकतात, वाहन वगैरे चालवताना सावधानी बाळगा. कोणा वृद्धाचा अपमान करु नका. आर्थिक बाजू साधारण राहील. मुलांच्या बाजूने काही चिंता होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादांमध्ये पडू नका.
 
मकर : ही वेळ एखाद्या धडयासारखी आहे. कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. महिनाअखेरच्या आठवडयात परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. धीर ठेवा तोच आपल्याला स्थिर ठेवेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही.
 
कुंभ : कार्य प्रगतीवर राहतील. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात काही त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत तणाव होऊ शकतो. पण संयमाने वागल्यास तुम्ही प्रकरण सांभाळू शकता. मुलांच्या बाजूने काही समस्यांचा सामना करावा लागेल. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते.
 
मीन : या संपूर्ण महिन्याभर उधार देऊ नका आणि घेऊही नका. मानसिकरीत्या सुदृढता जाणवेल. पैसे येण्याचे नवे मार्ग खुलतील. आरोग्याच्या भल्यासाठी बाहेर खाणे टाळा. सुर्योपासेनचा लाभ होईल. दूरुन एखाद्या शुभ समाचार कळू शकतो. अडकलेले धन पुन्हा मिळेल. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध प्राचीन जुने कॅथोलिक चर्च भोपाळ

श्री सूर्याची आरती

Bhanu Saptami 2024 भानु सप्तमीच्या दिवशी काय केले जाते?

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments