Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताााहिक राशीफल 25 ते 31 डिसेंबर 2022

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (20:29 IST)
मेष 
स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. महत्त्वाची कामाची कार्यवाही होईल. कलाकारांच्या हातून चांगल्या कलाकृती घडतील. घरात उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुणमंडळी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. प्रसंगनिष्ठ राहून आपले काम साधून घेण्यात आज आपल्याला यश लाभणार आहे. हौसे मौजेखातर पैसा खर्च होईल. मनस्वास्थ लाभेल.
 
वृषभ 
विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकारात घेतील. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. आपला निभाव लागणार आहे. आकर्षक खरेदी कराल. भावंडांसोबत सुसंवाद साधाल. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल.
 
मिथुन
आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. आपल्या राशीच्या व्ययस्थानातून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. राशीतील शुक्रामुळे आपला जगाकडे बघण्याचा कलात्मक दृष्टीकोन होणार आहे. नवनिर्मितीचा आनंद घ्याल. नवनवीन कल्पना आकार घेतील. कामाच्यामानाने आपली आवक कमी राहण्याची शक्यता आहे.
 
कर्क
मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. आपण आव्हानात्मक कामे स्वीकारुन यशस्वी करुन दाखविणार आहात. आशावादी धोरण स्वीकारा. आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आपली निकड भागणार आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल.
 
सिंह 
आपले अचूक अंदाज व योग्य व्यक्तींकडून मिळणारी मदत यामुळे आपली निकड भागणार आहे. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणार्‍या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. पैसा कमवण्यासाठी कठोर परिश्रम करण्यापेक्षा आपल्या बुद्धीमत्तेचा उपयोग करुन घ्यावा. सुयोग्य विचार आपणांस शक्ती देतील.
 
कन्या
व्यवसाय उद्योगात आशावादी धोरण स्वीकारा. व्यवसाय उद्योगात वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपणांस लाभदायक राहील. नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. बढती बदलीचे योग येतील. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होणार आहे. बौद्धीक व कला क्षेत्रात सुसंधी लाभतील. आपल्या आरोग्याच्या तक्ररींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
तूळ 
करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. महिला दैनंदिन जीवनातून विरंगुळा शोधण्याचा प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. काही खोट्या गोष्टी कानावर आल्यामुळे रागाचा पारा वर जाईल. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. दशमस्थ रवि, बुधामुळे लेखक, साहित्यिक, कवी, कलाकार यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल.
 
वृश्चिक 
जवळचे प्रवास टाळावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराल. महत्वाचे कागदोपत्रीचे व्यवहार मनोजोगे होतील. अथक परिश्रमाअंतीच आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे प्रसंगनिष्ठ राहून आपले काम साधून घेण्यात आपल्याला यश लाभणार आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल.
 
धनू 
कामाचा ताण जाणवणार नाही. ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून आज लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. स्वत:ची प्रतिष्ठा उंचावण्याकरीता आपल्या बुद्धीकौशल्याचा वापर करुन घ्याल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. काही प्रभावी लोकांनी मदत केल्याने उत्साह वाटेल. त्यामुळे मनातील गोंधळही कमी होईल.
 
मकर 
सांसारिक जीवनातील रुसवे फुगवे दूर होऊन सहजीवनाचा आनंद घ्याल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. पत्नीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आपल्या क्षमतेची व अर्मयाद कल्पनाशक्तीची स्वत:लाच कल्पना येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. व्यावहारिक स्पर्धेत आपण आग्रेसर राहणार आहात. सामाजिक कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांना चांगला प्रतिसाद मिळेल. नांवलौकिक प्राप्त होईल.
 
कुंभ 
नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील.नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक धार्मिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. हातून पुण्यकर्म घडेल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील.
 
मीन 
दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्‍यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. महत्वाचे निर्णयात योग्य व्यक्तिचे मार्गदर्शन लाभेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Tulsi Pujan Diwas 2024: तुळशीपूजनाचा दिवस कधी असतो? शुभ काळ आणि महत्त्व जाणून घ्या

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

आरती सोमवारची

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख