Marathi Biodata Maker

दैनिक राशीफल 10.06.2024

Webdunia
रविवार, 9 जून 2024 (17:20 IST)
मेष - कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. 
 
वृषभ - नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. 
 
मिथुन -  हाताबाहेर गेलेल्या गोष्टी रुळावर येतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुमचा मतलब साध्य कराल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. कामात बदल हवा असेल तर त्या दृष्टीने हालचाल करावी. 
 
कर्क - पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. .
 
सिंह - तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. 
 
कन्या -  सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. 
 
तूळ -  काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल.
 
वृश्चिक -  एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड असेल . सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. 
 
धनू - तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत अ-  पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल. 
 
मकर - तुमच्या प्रगतीला पूरक  वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी . व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल. 
 
कुंभ - अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल. 
 
मीन - गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सावधान! विवाहित पुरुषांनी 'या' ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, अन्यथा तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल!

घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी संध्याकाळी 'या' वेळी दिवा लावावा

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

आरती गुरुवारची

Ganga Dussehra 2026 गंगा दशहरा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, १० पापांपासून मुक्ती आणि पूजेची विधी

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments