Marathi Biodata Maker

मूलांक 5 साठी वर्ष 2024 कसे राहील

Webdunia
Annual Horoscope 2024 of Radix Mulank 5 : अंकशास्त्रानुसार वर्ष 2024 ची बेरीज 8 होत आहे जी शनीची संख्या आहे. यात चंद्राचा क्रमांक 2 आणि राहूचा 4 आहे. त्यामुळे हे वर्ष शनिमुळे स्थिरतेचे वर्ष मानले जात असतानाच चंद्र आणि राहूमुळे हे वर्ष चढ-उताराचे वर्ष असल्याचे बोलले जात आहे. जर तुमची मूलांक संख्या 4 असेल तर ती राहूची संख्या आहे. 2024 वर्षाचे अंदाज जाणून घ्या.
 
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झाला असेल तर मूलांक संख्या 5 असेल)
 
भविष्यफल : जन्म तारीख 5 असेल तर बुध, 14 असेल तर बुधासोबत सूर्य आणि राहू आणि 23 असेल तर चंद्र आणि गुरू सोबत बुधाचाही प्रभाव राहील. जर तुमची जन्मतारीख 5 असेल तर ते वर्ष चांगले राहील.
 
शिक्षण : तुम्ही शिक्षणात चांगले काम कराल कारण या वर्षी बुधामुळे तुमची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असणार आहे पण तुम्ही अभ्यासात निष्काळजी राहाल. कठोर परिश्रमापासून दूर जाऊ नका. अन्यथा अपयश येऊ शकते.
 
नोकरी : नोकरीत सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. यावर्षी उत्पन्नात वाढ होईल आणि कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. नवीन कामाच्या संधी मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते बदलू शकता.
 
व्यवसाय : गैरसमजामुळे किंवा एखाद्याच्या चुकीमुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय न घेणेच योग्य ठरेल. हुशारीने गुंतवणूक करा. मात्र बुधामुळे व्यवसाय चांगला चालणार आहे. शनिही तुम्हाला साथ देईल.
 
रिलेशनशिप : जर तुमचे तुमच्या जोडीदारावर खरे प्रेम असेल तर नाते टिकेल अन्यथा ब्रेकअप निश्चित आहे. नात्यात कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका आणि आत्मविश्वासाने पुढे जा. अशावेळी नीट विचार करूनच जमीन, इमारत, वाहन आदी खरेदीचा निर्णय घ्या. प्राधान्यक्रम सेट करा. तुमच्या मुलांसोबतचे तुमचे नाते कमकुवत होणार नाही याची काळजी घ्या.
 
आरोग्य : यावर्षी आरोग्याप्रती सावध राहण्याची गरज आहे. अस्वस्थता आणि तणाव असू शकतो. तुम्हाला पचनसंस्था, ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
 
विशेष अंक : वर्ष 2024 मध्ये तुमच्यावर 5, 8, 1, 2 आणि 3 या अंकांचा विशेष प्रभाव राहील.
शुभ दिन : बुधवार आणि शुक्रवार
शुभ रंग : पांढरा, हलका हिरवा खाकी रंग शुभ ठरेल.
रत्न : पन्ना

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas Special घरीच स्वादिष्ट आणि डेकोरेटेड या पाच प्रकारच्या कुकीज रेसिपी बनवा

बुध प्रदोष व्रताचे महत्त्व, पूजेची पद्धत आणि 5 फायदे जाणून घ्या

Best places for Christmas trips with kids कुटुंब सहलीसाठी ही ५ ठिकाणे सर्वोत्तम

जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी बुधवारी केवळ एक मंत्र जपा, परिणाम बघा

आरती बुधवारची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments