Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 20 मे 2024 ते 26 मे 2024

Webdunia
रविवार, 19 मे 2024 (17:34 IST)
मेष : आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही आर्थिक बाबींवर सकारात्मक हलचल अनुभवाल. तुम्ही कम्युनिकेशन द्वारे दूरच्या स्थानापासून चांगली कमाई करू शकता. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे हातात आले की अनेक मनोकामना जागृत होतात. नीट नियोजन करून मगच पैशाचे वाटप करा. व्यापारात फायद्यासाठी जवळच्या व्यक्ती तुमची खुशामत करतील. नोकरीत अधिकाराचा प्रमाणाबाहेर जाऊन वापर करावासा वाटेल 
 
वृषभ : या आठवड्यात तुम्हाला मित्रांची मदत मिळेल. कामाचा दर्जा उत्तम राखण्याकरता तुमच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न कराल. प्रकृतीस्वास्थ्य जपून कामाचे नियोजन करा. व्यापारधंद्यात उत्पादन आणि विक्रीचा वेग वाढवण्याचा इरादा असेल. पैशाची आवक चांगली राहिल्याने गरज भागेल. नोकरीत भरपूर काम कराल, पण स्वत:च्या मनाप्रमाणे वागणे पसंत कराल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या कडक धोरणाचा जाच वाटेल.  
 
मिथुन : हा आठवडा आर्थिक बाबींसाठी उत्तम राणार आहे. हाताबाहेर गेलेल्या गोष्टी रुळावर येतील. तुमच्या कार्यपद्धतीत आणि विचारात बदल होईल. व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधून तुमचा मतलब साध्य कराल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. कामात बदल हवा असेल तर त्या दृष्टीने हालचाल करावी. घरामध्ये आनंददायी घटनेची चाहूल लागेल. वेगळ्या स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध होईल.  
 
कर्क : या आठवड्यात तुम्ही मौज मस्ती आणि मनोरंजक प्रारुपांमध्ये अधिक लक्ष्य द्याल. पूर्वी मिळालेल्या अनुभवाचा नजिकच्या भविष्यात उपयोग होईल. व्यापारात जी कामे लांबली होती त्यांना हळूहळू वेग येईल. मात्र सभोवतालच्या व्यक्तींचे बदलणारे मूड पाहून काम करावे लागेल. सरकारी कामांना गती येईल. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमची अडचण व्यवस्थितपणे मांडलीत तर त्यातून ते मार्ग काढतील.  
 
सिंह : या वेळेस तुमच्यात जोश आणि उत्साह राहणार आहे. नेहमीच्या पद्धतीत बदल करणे तुम्हाला रुचत नाही. बदलत्या परिस्थितीमुळे तुमच्या कार्यपद्धतीत बदल करणे भाग पडेल. त्यातून नवीन शिकायला मिळेल. उद्योगधंद्यात बाजारातील चढउतार आणि स्पर्धकांच्या हालचाली यांचा ताळमेळ राखण्यासाठी तडजोड करावी लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्यावर उपाय योजावा लागेल.   
 
कन्या : या आठवड्यात तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे चढ उतार येण्याची शक्यता आहे. सहनशीलतेच्या पलिकडे एखादी गोष्ट गेली तरच बंडखोर स्वभाव उफाळून येतो. या सप्ताहात असा अनुभव येईल. काही गोष्टी घडत नसतील तर त्यात पुढाकार घेऊन कामाच्या मागे लागाल. व्यापारात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धी माध्यमांचा वापर करावा लागेल. सरकारी कामे गती घेतील. 
 
तूळ : या आठवड्यात व्यवसायी जातकांना कायदे व सरकारी प्रकरणांमुळे त्रास होईल. काम आणि प्रकृती दोन्हींचे नियोजन केले तर तणाव जाणवणार नाही. व्यवसायधंद्यात कामाचे प्रमाण भरपूर असल्याने समाधान वाटेल. मात्र गिऱ्हाईकांना शब्द देण्यापूर्वी विचार करा. पैशाची तरतूद करावी लागेल. भागीदाराच्या संमतीशिवाय निर्णय घेऊ नये. नोकरीत ठरविलेले उद्दिष्ट साध्य करण्याकरता मेहनत कराल.  
 
वृश्चिक : वृश्चिक जातक आठवड्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक बाबींपेक्षा कौटुंबिक प्रकरणांवर अधिक लक्ष्य देतील. एकीकडे घरगुती जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे व्यावसायिक कामांची गडबड असेल. सर्व कामे एकटय़ाने न करता इतरांवर विश्वास ठेवणे भाग पडेल. व्यापारात जादा कमाईच्या मोहाने न पेलवणारे काम स्वीकाराल. योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. नोकरीत नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल.  
 
धनू : व्यावसायिकरीत्या तुम्हाला कठिन परिस्थितित पुढे जाणे भाग पडणार आहे. या वेळेस सरकारी अडचणींमुळे कार्य विलंबाने पूर्ण होतील. तुमचे योग्य अंदाज आणि अपेक्षित व्यक्तींकडून मिळणारी साथ यामुळे तुमच्यातील कृतीशिलता वाढेल. सर्व आघाडय़ांवर पुढे जायचा तुमचा मानस राहील. व्यापारात सरळ मार्गाने कामे होत नाहीत असे पाहून वेगळ्या मार्गाचा अवलंब करावासा वाटेल.  
 
मकर : आठवडाचा पहिला दिवस आर्थिक बाबींसाठी अनुकूल आहे.  तसं तर या वेळेस तुम्ही मोठ्या फायद्याची उमेद लावू नका कारण तुम्हाला भाग्याचा साथ मिळणार नाही.  तुमच्या प्रगतीला पूरक असे वातावरण लाभेल. पूर्वी काही कारणामुळे रेंगाळलेल्या कामात योग्य उपाय सापडेल. त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल. व्यापारउद्योगात अचानक चांगली ऑर्डर मिळाल्याने उत्साही बनाल.  
 
कुंभ : या आठवड्यात आठव्या स्थानात राहू आणि सूर्यासोबत बुध वक्री आहे. यह ग्रहीय स्थिति आपके अनुकूल नहीं है।गेल्या काही महिन्यात तुम्ही बरेच बेत केले असतील. ते सफल झाले नसतील तर त्या दिशेने वाटचाल कराल. आलेल्या अनुभवांचा विचार करून तुमच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यवसाय-धंद्यात कामाचा वेग वाढवण्यासाठी ठोस उपाय योजाल.   
 
मीन : प्रेम संबंधांसाठी आठवडा फारच अनुकूल आहे कारण पाचव्या स्थानावर प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आहे. तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

श्री कृष्ण कवच

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

पुढील लेख
Show comments