मिथुन
आठवड्याच्या पहिल्या दिवशी पारिवारिक संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाचा साथ मिळणार आहे. कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हसित होईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. समाजात प्रतिष्ठित पद मिळू शकतो. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहतील. स्त्री पक्षाचा आधार राहील. व्यवसायात भागीदार किंवा खास मित्राची मदत मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला विदेश यात्रा घडू शकते. ज्या लोकांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ फारच उत्तम ठरणार आहे. आई वडिलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटेल. तुम्ही जन कल्याणाच्या कार्यांमध्ये तुमचे सहकार्य द्याल. त्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नवीन करार करण्यात यश मिळेल.