मकर
ज्या वेळी भरपूर पैसे हातात असतात त्या वेळी तुमची कळी खुलते. सध्याचे ग्रहमान त्यादृष्टीने प्रसन्न आहे. प्रत्येक सुख तुम्हाला हवेसे वाटेल. व्यापारधंद्यात जितके जास्त काम तितकी कमाई जास्त असे समीकरण असेल. रात्र थोडी सोंगं फार अशी तुमची अवस्था राहील. नवीन कल्पना साकार करण्याकडे कल राहील. नोकरीत तुमच्या कामाला महत्त्व येईल. त्याकरता तुमची विशेष बडदास्त ठेवली जाईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्यांना मनाप्रमाणे संधी लाभेल.