मेष
एक चांगले आणि एक वाईट वाटय़ाला येणार आहे. मोठी मजल गाठण्याचे तुमचे उद्दिष्ट असेल. जास्त विचार न करता बिनधास्त राहा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. व्यापारात नेहमीच्या पद्धतीने अपेक्षित यश मिळत नाही असे जाणवून जाहिरात आणि प्रसिद्धीचे नवीन तंत्र अवलंबाल. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तुमची तयारी असेल.