मीन
परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्रभ्रमण होत आहे. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. संतसज्जनांचा सहवास लाभेल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील.