Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dr.Ambedkar Jayanti 2022 Marathi Wishes :डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मराठी शुभेच्छा

Webdunia
गुरूवार, 14 एप्रिल 2022 (07:53 IST)
* निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* फुलांची कथा बहरांनी लिहिली होती
ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली
आम्ही कोणाचे गुलाम नाही
कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले!
भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* मनुस्मृती’दहन करून “भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम.
 
* ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
 
* मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची
तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
 
* राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
 
* सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
 
* मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
 
* सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
 
* जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
 
* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
 
* भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखो घरांचा झाला उद्धार
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!
 
* माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
 
* 14 एप्रिल 1891 ला
सोनियाची उगवली सकाळ
जन्मास आले भीम बाळ.
सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
* दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले,
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला
घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत
कस नाही,
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहूनगेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments