Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार Dr Babasaheb Ambedkar Quotes in Marathi

Webdunia
शनिवार, 8 एप्रिल 2023 (18:12 IST)
ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो.
 
बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
 
मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.
 
लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे. हे सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.
 
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे.
 
आपण प्रथम आणि शेवटी भारतीय आहोत.
 
 
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
 
शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
 
मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
 
शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी आहे.
 
 
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
 
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
 
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
 
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.
 
महापुरुष हा प्रसिद्ध माणसापेक्षा वेगळा असतो, तो समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
 
 
ह्या जगात स्वाभिमानाने जगायला शिका. आपल्याला काही तरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा सदैव असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
 
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
 
शिका !
संघटित व्हा !!
संघर्ष करा !!!
 
मी महिलांनी केलेल्या कामगिरीवरून समाजाची प्रगती मोजतो.
 
एक महान माणूस प्रतिष्ठित माणसापेक्षा अशा प्रकारे वेगळा असतो की तो समाजाचा सेवक होण्यासाठी तयार असतो.
 
माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.
 
यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक आहे.
 
एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
 
कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे.
 
मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे.
 
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
 
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे. लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
 
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
 
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
 
सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
 
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.
 
आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ TMC ने दिली नोटिस

LIVE: मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बोट उलटली

MSRTC नवीन वर्षात प्रवाशांना खास भेट देणार आहे भरत गोगावले यांनी केली मोठी घोषणा

शरद पवार शेतकर्‍यांन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले

पुढील लेख
Show comments