Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्नाटक: कुमारस्वामी सरकार कोसळलं, भाजपच्या हालचालींना वेग

Webdunia
कर्नाटकातलं JDS-काँग्रेस आघाडीचं कुमारस्वामी सरकार कोसळलं आहे. विधानसभेत झालेल्या मतमोजणीत हे सरकार अल्पमतात असल्याचं उघड झालं.
 
कुमारस्वामींना 99 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात 105 मतं पडली. कर्नाटक विधानसभेत सध्या 210 आमदार आहेत. बहुमतासाठी 106 आमदारांची गरज होती.
 
मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी लवकरच राजीनामा देणार आहेत. त्यांचा पराभव होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
 
तिथे भाजपचे नेते येदियुरप्पा सत्तास्थापनेचा दावा करू शकतात, अशा बातम्या स्थानिक कन्नड वृत्तवाहिन्या देत आहेत.
 
'हा घटनेचा खून'
हा भारतीय घटनेचा खून आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. तिथे सरकार पाडण्यासाठी भाजपने राजभवन आणि पैशांचा वापर केला, असा आरोप काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला.
 
तर हा लोकांचा विजय आहे, असं भाजपने म्हटलं आहे. आता लोकांचं सरकार अस्तित्वात येईल, असं प्रदेश भाजपने म्हटलं आहे.
 
विश्वासदर्शन ठरावादरम्यान कर्नाटकचे मावळते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभेत भाषण केलं.
 
ते म्हणाले की, "सत्ता तुमच्याकडे सर्वकाळ राहत नाही. मी विश्वासदर्शक ठरावासाठी तयार आहे. सोशल मीडियावर माझ्याविरुद्ध लिहीत आहेत की मी पंचतारांकित हॉटेलात राहून लोकांना लुटत आहे. मी काय लुटेन? मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना म्हणेन की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज द्यावी. ते सोशल मीडियाचा वापर करून समाजाचं मोठं नुकसान करत आहेत."
 
याआधी काय झालं?
काँग्रेसच्या आमदारांनी अचानक राजीनामा द्यायला सुरुवात केली. पण त्यांचे राजीनामे सभापती रमेश कुमार यांनी स्वीकारले नाहीत. त्यानंतर हे 15 आमदार मुंबईमध्ये वास्तव्यास आले होते.
 
दरम्यान, कुमारस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं अशी मागणी कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी केली. कुमारस्वामी सरकारने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, असं वाला यांनी बजावलं. त्याविरोधात कुमारस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
 
यापुढे काय होणार?
सध्याच्या विधानसभेत कुणाकडेही बहुमत नाहीये. आताच्या परिस्थितीत त्रिशंकू स्थिती आहे. जेडीएस-काँग्रेस पराभूत झालं असलं तरी भाजपकडेही बहुमत नाहीये. काँग्रेसमधून फुटून आलेले आमदार भाजपमध्ये आले तरी त्यांना पुन्हा निवडून यावं लागेल. आम्ही सर्व बंडखोरांचं स्वागत करू, असं भाजपने म्हटलं आहे.
 
आता भाजपची बैठक होणार आहे. स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत की आता भाजप सत्तास्थापनेचा दावा करू शकतं. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा हे कर्नाटकातले भाजपने नेते आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments